शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

वसईच्या एका घरातील ८० जण करणार देहदान

By admin | Published: January 19, 2016 2:03 AM

आजोबांच्या २५ व्या स्मृतिदिनी लोपीस कुटुंबीयांनी देहदान करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर, देहदानासाठी नोंदणी करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.

वसई : आजोबांच्या २५ व्या स्मृतिदिनी लोपीस कुटुंबीयांनी देहदान करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर, देहदानासाठी नोंदणी करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशनपूर्वी काही अनुचित प्रकार घडल्यास देहदान कराच, असा आग्रहही कुटुंबीयांनी केला आहे.विरारजवळील उंबरगोठण गावातील लोपीस कुटुंबीयांच्या या निर्णयाचे वसईत स्वागत केले जात आहे. एकाच बंगल्यात लोपीस कुटुंबातील ८० सदस्य गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आजोबा बसत्याव लोपीस यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त देहदान, अवयवदान आणि नेत्रदानाविषयी प्रबोधन करण्यासाठी एलायस लोपीस यांनी कुुटुंबाकरिता व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यानाने प्रेरित होऊन लोपीस कुटुंबीयातील सर्वच सदस्यांनी देहदानाचा संकल्प सोडला. देहदान आणि अवयवदान नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी बरेवाईट घडले तर देहदानाच्या तांत्रिक बाबींमध्ये अडकून न पडता आमची इच्छा पूर्ण करा, असे कुटुंबातील सर्व सदस्यांनी आवर्जून सांगितले. देहदान चळवळीला सरकारी लालफितीच्या कारभारामुळे अडथळे येत असले तरी दुसरीकडे वसईतील आगाशी गावातील एकाच कुटुंबातील ८० सदस्यांनी देहदान व अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. देह आणि अवयवदानात ८० वर्षांच्या कुटुंबप्रमुखापासून अगदी युवा पिढीतील सदस्यांनी सहभाग घेतला आहे. सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या संपूर्ण कुटुंबाने देहदानाचा निर्णय घेऊन एक आदर्श पायंडा सुरू केल्याची भावना वसईत व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)