शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

१४३ ग्रामपंचायतींच्या ९९६ सदस्यांसाठी ८० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:08 AM

ग्रामपंचायतींसाठी दोन लाख ५० हजार १६८ जणांंना मतदानाचा हक्क मिळाला होता. यात एक लाख ३१ हजार ९१६ पुरुषांसह एक लाख १८ हजार २५० महिला मतदार होते.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या ९९६ सदस्यांसाठी उभ्या असलेल्या दोन हजार ४१३ उमेदवारांना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज तहसीलदार राजेंद्र तवटे यांनी व्यक्त केला. मतमोजणी १८ जानेवारीला प्रत्येक तालुक्याच्या निश्चितस्थळी पार पडणार आहे.भिवंडीतील एका मतदान केंद्रावर सकाळी काही वेळेसाठी ईव्हीएम मशीन बंद पडले होते; पण ते त्वरित पूर्ववत करण्यात आले. याव्यतिरिक्त कोठेही काहीही घडले नसल्याचा दावा तवटे यांनी केला.

ग्रामपंचायतींसाठी दोन लाख ५० हजार १६८ जणांंना मतदानाचा हक्क मिळाला होता. यात एक लाख ३१ हजार ९१६ पुरुषांसह एक लाख १८ हजार २५० महिला मतदार होते. या मतदानापैकी ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. शेवटच्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी मिळण्यास रात्री उशिर होणार आहे; परंतु शेवटच्या दीड तासात म्हणजे ५.३० वाजेपर्यंत साडेचार ते पाच टक्क्यांच्या अंदाजासह जिल्हाभरात ८० टक्के मतदानाचा अंदाज तवटे यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, सकाळी १०.३० वा. १७ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ३९ टक्के, त्यानंतरच्या टप्प्यात ५६ आणि ३.३० वाजता ७१ टक्के मतदान झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे.

तालुकानिहाय मतदानतालुका    ग्रा.पं.    मतदान    टक्केवारीमुरबाड    ३९    २३०४२    ७०.७२अंबरनाथ    २६    २७,७७१    ७४.७६भिवंडी    ५३    ८९,८५५    ७५.४४कल्याण    २०    ३२,०८३    ६०.६०शहापूर    ५    ५८६२    ६७.००

पाच ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी आली नाहीठाणे : एकही उमेदवारी अर्ज न आलेल्या ठाणे तालुक्यातील पाच ग्रामपंचायती वगळता जिल्ह्यातील या १५८ ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी निवडणुका हाती घेतल्या होत्या. त्यासाठी चार हजार ३८८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींसह ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ९९६ सदस्यांच्या १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणातील दोन हजार ४१३ उमेदवारांचे नशीब मतदारांनी ईव्हीएम मशीनमध्ये बंद केले आहे. जिल्ह्यातील या आजच्या मतदानासाठी निश्चित केलेल्या ४७९ मतदान केंद्रांवर तब्बल दोन हजार ९०० अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी तैनात होते.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक