ठाणे : जिल्ह्यातील ४१ पैकी ३५ ग्रामपंचायतींसाठी (ग्रा.पं.) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले. त्यानंतर, रात्री उशिरापर्यंत ५.३० वाजेपर्यंतची आकडेवारी प्राप्त झाली नाही. मात्र, सुमारे ८० टक्के मतदान जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींसाठी झाल्याचा अंदाज अधिकाºयांकडून वर्तवला जात आहे. मंगळवारी विविध ठिकाणी याची मतमोजणी होणार आहे.सुमारे २३५ सदस्यांसह सरपंचपदासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आज संध्याकाळपर्यंत शांततेत मतदान झाले. ३५ ग्रा.पं.च्या ५७ हजार ६०४ मतदानापैकी ११.३० वा.पर्यंत ४२ टक्के, तर ३.३० वाजेपर्यंत ७० टक्के म्हणजे ४० हजार ३४८ मतदारांनी मतदान केले. यापैकी कल्याण तालुक्यात ७९.७३ टक्के, शहापूरला ८२.७५ टक्के, मुरबाडला ८०. ६६ टक्के मतदान साडेतीन वाजेपर्यंत झाले आहे. तर, कल्याण तालुक्यात ५.३० वाजेपर्यंत ८४.८४ टक्के मतदान झाल्याचे निश्चित झाले. मात्र, उर्वरित तालुक्यांमधील शेवटच्या राउंडच्या मतदानाची टक्केवारी उशिरापर्यंत प्राप्त झाली नाही. मात्र, सुमारे ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुमारे १२३ मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडले. या मतदानासाठी सुमारे ४५० बॅलेट युनिट, तर २३० कंट्रोल युनिटचा वापर करण्यात आला.जिल्ह्यातील ३९२ जागांपैकी २३५ उमेदवारांसाठी मतदान झाले. उर्वरित २७ जागांसाठी उमेदवार नसल्याने त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया झाली नाही.मतमोजणी १७ आॅक्टोबरला प्रत्येक तहसीलदार कार्यालय परिसरात होणार आहे. भिवंडी तालुक्याची मतमोजणी स्वर्गीय राजेय्या गांजेरगी हॉल, भिवंडी येथे होणार आहे. कल्याण तालुक्यातील मतमोजणी १३८ विधानसभा मतदारसंघ कार्यालयात होईल.
ग्रामपंचायतींसाठी ठाणे जिल्ह्यात ८० टक्के मतदानाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 6:32 AM