ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे गुरुवारी ८२२ रुग्ण आढळले असून ५२ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १३ हजार ५४८ बाधितांची नोंद झाली असून मृतांची संख्या नऊ हजार ६१ झाली आहे.
ठाणे शहरात १५४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख २८ हजार ४३७ झाली. शहरात सात मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ८७७ नोंदवण्यात आली. कल्याण - डोंबिवलीत १९९ रुग्णांची वाढ झाली असून २३ मृत्यू झाले आहेत. आता एक लाख ३२ हजार ४१९ रुग्ण बाधित असून एक हजार ९२१ मृत्यूंची नोंंद झाली आहे. उल्हासनगरला ५३ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या २० हजार २५६ झाली असून ४६९ मृतांची नोंद आहे. भिवंडीला सात बाधित असून मृत्यू नाही. आता बाधित १० हजार ४२४ असून मृतांची संख्या ४३६ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये १३९ रुग्ण आढळले असून चार मृत्यू आहेत. या शहरात बाधितांची संख्या ४८ हजार ६१३ असून मृतांची संख्या एक हजार २६१ वर गेली आहे.
अंबरनाथमध्ये २० रुग्ण आढळल्याने आता बाधित १९ हजार २०४ असून दोन मृत्यू आहेत. येथील मृत्यूंची संख्या ४०५ झाली आहे. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या २० हजार ४७६ झाली आहे. या शहरात तीन मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या २५३ झाली आहे. ग्रामीणमध्ये ११५ रुग्णांची वाढ झाली असून सात मृत्यू आहेत. आता बाधित ३६ हजार ३३ झाले असून आतापर्यंत ८६० मृत्यू झाले आहेत.