ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत रविवारच्या तुलनेत 22 जणांची घट झाल्याने सोमवारी 859 रुग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या एक लाख 15 हजार 624 झाली, तर तीन हजार 301मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तीन शहरांमध्ये आज एकही मृत्यू झालेला नसल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यातील या रुग्ण संख्येपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 125 रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरात 24 हजार 584 रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली. तर पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजपर्यंत 792 मृतांची नोंद झाली आहे. कल्याण - डोंबिवली मनपा क्षेत्रात 194 रुग्णांची आज नोंद झाली असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 26 हजार 817 रुग्ण बाधीत झाल्याची तर 565 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात 308 रुग्ण सापडले असून आज तीन मृतांची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आतापर्यंत 23 हजार 629 बाधितांची तर 545 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. उल्हासनगरला 14 रुग्ण तर चार मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत सात हजार 599 रुग्णांची आणि 213 मृतांची नोंद करण्यात आली आहे.
भिवंडी मनपा क्षेत्रात गेल्या काही दिवसांप्रमाणे आजही मृत्यूची नोंद झाली नाही. केवळ 14 रुग्ण सापडले आहेत. आता या शहरात आतापर्यंत चार हजार 76 बाधितांची तर मृतांची नोंद 281आहे. मीरा भाईंदरला 75 रुग्णांची तर, सहा जणांच्या मृत्यूची नोंद आज केली आहे. या शहरात बाधितांची संख्या 11 हजार 671असून 396 मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे.
अंबरनाथला रविवारच्या तुलनेत दुप्पटीने कमी म्हणजे 16 रुग्णांची नोंद आज झाली असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. आता बाधितांची संख्या चार हजार 713, तर,मृत्यू 180 आहेत. बदलापूरमध्ये 23 रुग्णांची नोंद आज झाली असून बाधितांची संख्या आता तीन हजार 836 झाली. या शहरात आजही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे आतापर्यंत 65 आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांत 90 रुग्ण सापडले असून सहा मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या आठ हजार 699 तर मृत्यू 264 झाले आहेत.