ठाणे : पालघर जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात सुमारे ९४ शिक्षक शासकीय नियमानुसार विकल्पाने हजर झाले आहेत. ते मागील तीन ते चार महिन्यांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात येऊन केवळ मस्टरवर हजेरी लावत आहेत. मात्र, शाळाच न मिळाल्याने ते वेतनापासूनदेखील वंचित असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.पालघर जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात विकल्पाने ९४ शिक्षक प्राप्त झाले आहेत. या शिक्षकांपैकी १३ शिक्षक हे जानेवारी २०१९ रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दाखल झाले आहेत. ते नियमितपणे ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात येऊन हजेरी लावत आहेत. ही प्रक्रिया गेल्या पाच महिन्यांपासून नित्याने सुरू आहे. विचारणा केल्यावर त्यांना निवडणुकीचे कामकाज, आचारसंहितेचे कारण सांगण्यात येत होते. आता मे महिन्यात पालघरहून ८० शिक्षक पुन्हा विकल्पाने दाखल झाले आहेत.शिक्षकांनादेखील आचारसंहितेचे कारण देऊन शाळा देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनादेखील दोन महिन्यांपासून शाळा न मिळाल्याने तसेच त्यांना हजर करून घेण्यात न आल्याने त्यांना वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे.
पालघरहून हजर झालेले ९४ शिक्षक वेतनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 1:46 AM