- सदानंद नाईक
उल्हासनगर : अंमली पदार्थ विरोधी अभियाना अंतर्गत ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथक व शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेगवेगळ्या व कारवाईत १ लाख ९० हजार किंमतीचा तब्बल ९ किलो पेक्षा जास्त गांजा जप्त केला. तर याप्रकरणी तिघांना अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-५ नेताजी चौक परिसतात गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती ठाणे अंमली विरोधी पथक ठाणे यांना मिळाली. विभागाने बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान नेताजी चौक परिसरात संशयितपने फिरणाऱ्या प्रफुल रोकडे व दीपक सकट यांची अंगझडती घेतली. तेंव्हा त्यांच्याकडे तब्बल ६ किलो ५०० ग्रॅम गांजा मिळून आला. त्याची किंमत १ लाख ३० हजार ८०० रुपये असून दोघांना अटक करून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत शहर गुन्हे अन्वेषण विभागाने कॅम्प नं-३ येथील संजय गांधीनगर झोपडपट्टीतील श्रीहरी उर्फ चिया गाजंगी यांच्या घरावर बुधवारी धाड टाकली. त्याच्याकडून ५४ हजार ७६०० किंमतीचा २ किलो ६०० ग्राम गांजा जप्त केला.
ठाणे अंमली पदार्थ व शहर गुन्हे अन्वेषण विभागाने वेगवेगळ्या धाडीत एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा तब्बल ९ किलो गांजा जप्त केला. तर हिललाईन पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री दोन वेगवेगळ्या कारवाईत गांजा पिणाऱ्या हाजीमलंग परिसरातून चौघांना अटक करून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. ठाणे अंमली पदार्थ विरोधी अथक व शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईने करून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.