शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

माहीममध्ये ९ जणांना मलेरिया

By admin | Published: August 19, 2015 11:45 PM

माहीम ग्रामपंचायत क्षेत्रातील नवोदय विद्यालयाजवळील लॅण्डमार्क या रहिवासी संकुलातील इमारतीमध्ये काम करणाऱ्या नऊ कामगारांना

पालघर : माहीम ग्रामपंचायत क्षेत्रातील नवोदय विद्यालयाजवळील लॅण्डमार्क या रहिवासी संकुलातील इमारतीमध्ये काम करणाऱ्या नऊ कामगारांना मलेरियाची लागण झाल्याने त्यांना मंगळवारी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पालघर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रहिवासी संकुले उभी राहत असून त्यांचे बांधकाम करण्यासाठी जव्हार, मोखाडा, विक्रमगडसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागांतून मोठ्या प्रमाणात कामगारांचे तांडेच दाखल होत आहेत. इमारती उभारताना बाजूलाच छोटीशी राहुटीवजा झोपडी उभारून ही कुटुंबे अत्यंत गलिच्छ वातावरणात राहत असतात. संबंधित बिल्डरांनी या कामगारांची राहण्याची व सोयीसुविधांची व्यवस्था करणे बंधनकारक असताना त्याकडे काणाडोळा करण्यात येतो. माहीम ग्रामपंचायत क्षेत्रातील नवोदय विद्यालयाजवळ लॅण्डमार्क हे बंगलो प्रोजेक्ट संकुल उभारण्याचे काम कित्येक वर्षांपासून सुरू असून या प्रोजेक्टवर काम करणारे बिपिन रावत, शिवकुमार रावत, कैलास रावत, वेदनारायण रावत, अनुप रावत, कालू रावत, पप्पू रावत, अरविंद रावत, बीरेन रावत या तरुणांनी खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान रक्ततपासणी केली असता त्यात सर्वांना मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले. तर, टेंभोंडे येथील एका मोठ्या संकुलाच्या बांधकामादरम्यान मलेरियाची लागण झाल्याने दोघांचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला होता. याबाबत उपाय करण्यासंदर्भात ग्रामपंचायत उदासीनता दाखवत आहे. (वार्ताहर)