शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

मीरारोडमध्ये मशिदीसमोर भगवे झेंडे फडकावत धार्मिक घोषणा देणाऱ्या ९ जणांना अटक 

By धीरज परब | Published: April 07, 2023 8:54 AM

स्थानिक मुस्लिम बांधव संतप्त होऊन जमावाने जमले मात्र त्यांनी शांतता राखली शिवाय पोलिसांनी त्यांची समजूत काढत व आरोपीना अटक केल्याने वाद टळला. 

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर भागातील एका मस्जिद समोर दुपारची नमाज संपल्या नंतर भगवे झेंडे फडकावून धार्मिक घोषणा दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र स्थानिक पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक केली. तर असाच प्रकार बुधवारी करणाऱ्या तिघांना देखील अटक करण्यात आली. स्थानिक मुस्लिम बांधव संतप्त होऊन जमावाने जमले मात्र त्यांनी शांतता राखली शिवाय पोलिसांनी त्यांची समजूत काढत व आरोपीना अटक केल्याने वाद टळला. 

नया नगर परिसर हा मुस्लिम बहुल असून सध्या त्यांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरु आहे. दुपारी १ ते २ दरम्यान नमाज अदा केली जात असल्याने गुरुवार ६ एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक सचिन शेडगे व अंमलदार गोडवे हे गस्त घालत होते . सव्वा २ च्या सुमारास लोढा मार्ग येथील मोहम्मदी मस्जिद समोर गर्दी व गोंधळ दिसल्याने पोलीस तिकडे गेले. त्यावेळी दुचाकी वरून आलेल्या व हातात भगवे झेंडे असलेल्या दोघांना रहिवाश्यांनी पकडून ठेवले होते. 

रहिवाश्यांनी सांगितले कि , नमाज साठी लोक आले असताना दुचाकी वरून हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या तरुणांनी जाणीवपूर्वक मुस्लिम बांधवां कडे पाहून जोराने हॉर्न वाजवले व धार्मिक घोषणा देऊ लागले . त्यामुळे लोकांनी एका दुचाकी वरून जाणाऱ्या दोघांना पकडले तर बाकीचे सर्व पळून गेले . शेडगे यांनी त्या दोघांना पकडून नया नगर पोलीस ठाण्यात आणले . तर अन्य दोघांना निवृत्ती कर्डेल व मनीषा चौधरी ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडून आणले. अभी रवींद्र सिंग (१९) राम राजश्री , इंद्रलोक ; शुभम मुन्ना विश्वकर्मा (१९) रा . महावीर नगर , ऑरेंज रुग्णालय जवळ ; ज्ञानी युवराज रावल (१८) रा . श्री बालाजी कृपा , इंद्रलोक फेज ६ सह एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पकडलेल्यात समावेश आहे . नंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

तर बुधवार ५ एप्रिल रोजी पहाटे नया नगर मधील नीलम पार्क भागातल्या महंमदीया मदरसा जवळ येऊन तिघांनी असाच भगवे झेंडे घेऊन धार्मिक घोषणा देण्याचा प्रकार केला होता . त्याचा निवृत्ती कर्डेल यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल होऊन पोलीस सीसीटीव्ही आधारे तपास करत होते . फुटेजच्या आधारे शोध घेऊन सहायक निरीक्षक पराग भाट , ओमप्रकाश पाटील , विकास यादव , विजय गुरव, महेश खामगळ यांच्या पथकाने  शषीतोश श्रीफुलचंद पाल (वय २० वर्ष),  केतन महादेव बंडवे (वय २६ वर्ष) व कानसिंग शेतान सिंग रावल (वय १८) ह्या तिघांना गुरुवारी मीरारोडच्या क्वीन्स पार्क भागातून पकडले आहे.  

सततच्या दोन घटनांनी नया नगर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस ठाण्या बाहेर सुद्धा जमाव जमला.  मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात शांतता निर्माण करत आरोपीना गुन्हा दाखल करून तात्काळ अटकेची कारवाई केली . मुस्लिम बांधवानी सुद्धा समंजसपणा दाखवला. समाजात एकोपा टिकविण्यास बाधक व सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी २ गुन्ह्यात एकूण ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी हे सर्व भाईंदर - मीरारोड पूर्व भागातील तरुण आहेत . घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आययुक्त श्रीकांत पाठक सह अन्य अधिकाऱ्यांनी नया नगर मध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस