ठाणे : आपले कर्म ठरवते आपले काय होणार. तुमचे नशिब तुम्ही घडवता तुमचे तारे नाही. ९० टक्के हिंदू धर्मात अंधश्रद्धा श्रद्धा म्हणून पाळल्या जातात असे मत अतुल समर्थ यांनी ठाण्यात व्यक्त केले.
स्वामी विश्व सेवा संघ व अजोर फाऊंडेशन ट्रस्ट यांच्यावतीने ठाण्यातील एनकेटी सभाग्रुहात समर्थ यांचे अंधश्रद्धा विरोधी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यक्तिच्या अंगात येते हे मला मान्य नाही. देवाला कोणाच्या अंगाची गरज लागत नाही. काहीतरी मिळवण्यासाठी असलेली देव ही संकल्पना मला कधिच मान्य नाही. देवाकडे जाण्याचा मार्ग हा द्न्यान आहे. करणी ह्या प्रकारावर अनेकांचा विश्वास आहे. मात्र असे काही असते तर सीमेवर सेनेची गरज लागली नसती. लिंबू नावाच्या बाँबने परकीय सैन्यावर करणी केली की सगळी समस्या संपली असती. देवाने अशी कोणतीही वाईट शक्ति निर्माण केली नाही. आध्यात्म म्हणजे एक झाड आहे, फळ देणे हे त्याचे काम आहे. तुम्ही ते फळ चोरुन, दगड मारुन किंवा कसे घेता ते तुमच्यावर अवलंबून असते. काही तरी मिळवण्यासाठी जप हा मोजुन केला जातो. आपण श्वास मोजुन घेतो का , मग जप कसा मोजता. माझ्या श्वासात स्वामी आहेत, त्यामुळे स्वामी माझे ऐकतात असे अतुलदादा पुढे म्हणाले.
आपले अनुभव कथन करताना ते म्हणाले, एक मुलगी लग्न हाेण्यासाठी दासबोध वाचत असे. मी तिला म्हंटले ज्यांनी स्वतः लग्न केले नाही ते लग्नासाठी तुला मदत करणार नाही. वडाला फेर्या मारुन सात जन्म काही मिळत नाही. मात्र झाडाला देव बनवल्याने झाडे तुटण्यापासुन वाचतात हेच कारण आहे असे समर्थ यांनी सांगितले.
यावेळी वास्तूविषारद सुप्रिया समर्थ यांनी घरात उपलब्ध वस्तूंपासून वास्तूतील दोष निवारण मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या स्वयंपाक घर म्हणजे घराचा आत्मा. तो प्रसन्न असला की प्रगती होतेच. स्वयंपाकगृह हे घराच्या अग्नेय दिशेला असावे.त्यात पुर्व दिशेचस स्वयंपाक घर काही प्रमाणात चालते. मात्र इतर दिशेला ते असल्यास घरातील लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी पिरॅमिड म्हणजे प्लास्टिक हा उपाय नाही. घरात असलेले खडे मिठ घरात चारही कोपर्यांमधे ठेवल्यास सकारात्मक उर्जा निर्माण होते. स्वयंपाक घरात पाणी आणि अग्नि एकत्र येतात त्यामुळे समस्या निर्माण होतात. यावर उपाय म्हणुन मातीच्या मडक्यात लाकडी चमचे भरुन या दोन्हिच्या मधे ठेवावे. उपवरांच्या लग्नाला विलंब होत असल्यास दर गुरुवारी चिमुटभर हळद अंघोळीच्या पाण्यात घालावी. वाईट स्वप्न पडत असल्यास उशीखाली लसुन पाकळ्या ठेवाव्या. स्वयंपाकघर पुर्व, उत्तर, इशान्य दिशेला असल्यास शेगडीखाली हिरवा खडा तर दक्षिण, नैऋत्य व पश्चिमेला असल्यास पिवळा खडा ठेवावा. मुलांचे अभ्यासात लक्ष नसल्यास घरात पुदीन्याच्या काडया ठेवाव्या. असे अनेक उपाय सुप्रिया यांनी सांगितले. कार्यक्रमाचे निवेदन अश्विनी कानोलकर यांनी केले.