ठाणे : बुलेट ट्रेनमुळे बाधित होणाऱ्या कांदळवन व पक्ष्यांची किती भरपाई देणार, बाधित होणारे ३४ तलाव अन्यत्र कुठे पुनरुज्जीवित करणार, गुजरात व महाराष्ट्रातील शेतकºयांना वेगवेगळा मोबदला का, जमिनीचा पाचपट मोबदला दुपटीवर कसा घसरला, बुलेट ट्रेन अहमदाबादला नव्हे दिल्लीला घेऊन जा, या व अशा एक ना अनेक प्रश्नांनी प्रकल्प अधिकारी आर.पी. सिंह यांना चक्रावून टाकले. तुमच्या ९० टक्के प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, अशी कबुली देत सिंह यांनी ठाणेकरांपुढे हात टेकले.बुलेट ट्रेनच्या पर्यावरणीय परिणामांबाबत माहिती देण्याकरिता आयोजित जनसुनावणीत मनधरणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुलेट ट्रेनच्या संदर्भात मंगळवारी गडकरी रंगायतनमध्ये पर्यावरणीय जनसल्लामसलत बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु, या बैठकीत शेतकरी काय प्रश्न विचारणार, याचा अंदाज कदाचित न आल्याने अधिकारी प्रश्नांनी चक्रावून गेले. या बैठकीला बुलेट ट्रेनचे मुख्य प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अधिकारी, पर्यावरणाचे गाढे अभ्यासक आदींसह इतर विभागांचे तज्ज्ञ व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी येणाºया प्रत्येक नागरिकाच्या हाती सात ते आठ पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता. नागरिकांच्या हाती देण्यात आलेला अहवाल आणि प्रशासनाचे सादरीकरण यामध्ये तफावत असल्याने शेतकरी व पर्यावरणविषयक कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला.यावेळी विचारले गेलेले काही अडचणीचे प्रश्नही जनसुनावणी आहे की, सल्लामसलत आहे. कार्यक्रमाला आल्यावर हा अहवाल का देण्यात आला. यापूर्वी तो देणे अपेक्षित होते. त्यामुळे आमची मते हवी असतील, तर आम्हाला महिनाभराचा अवधी द्या. पक्षी, पर्यावरण, कांदळवन आणि शेतकºयांना किती मोबदला दिला जाणार, याचा उल्लेख कुठेही नाही. हा अहवाल केवळ नेटवरील माहितीवरून बनवण्यात आला आहे. नदीचे पात्र विस्कळीत होणार आहे. त्यामुळे संभावित धोक्याची कोणतीही माहिती अहवालात देण्यात आलेली नाही. बोगदे काढल्याने जनजीवन विस्कळीत होणार आहे. त्याचाही उल्लेख नाही.- अॅड. भारद्वाज चौधरी, नागरिकजपानच्या जायका यांनी जे काही नियम केले आहेत, त्यांचा उल्लेख न करून या अहवालात त्यांनाही बगल देण्यात आली आहे. नियम चुकीचे तयार करण्यात आले आहेत.-शार्दुल मनोरकर, नागरिकअपूर्ण माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. कांदळवनाचे संवर्धन, शेतकरी, पर्यावरणाची हानी याबाबत स्पष्ट उल्लेख करणे टाळले आहे. शेतकºयांचा कोणत्याही प्रकारे उल्लेख करण्यात आलेला नाही.- संतोष केणे, स्थानिक नागरिकप्रकल्पाचे सामाजिक परिणाम होणार आहेत, परंतु ते कसे होणार, याचा उल्लेख टाळण्यात आला आहे. ३४ तलाव बाधित होणार आहेत, परंतु त्यांचे पुनरुज्जीवन कसे केले जाणार? हे तलाव कोणत्या गावातील आहेत, लोकेशन काय आहे, याचाही उल्लेख अहवालात टाळण्यात आला आहे. नद्यांचा प्रवाह बदलला जाणार आहे. बाहेरचे मजूर येथे येणार असल्याने स्थानिकांबरोबर संघर्ष अटळ आहे. ठाणे किंवा इतर महापालिकांना कचरा, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी अद्याप तोडगा काढता आलेला नसताना तुम्ही कोणत्या पद्धतीने कचरा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणार, याचा उल्लेख नाही. मातीचा कस लयाला जाणार आहे, तो कसा भरून काढणार.- मयूरेश भडसावळे, जागरूक नागरिकप्रकल्पाचे सर्व्हे करताना शेतकºयांना नोटिसा बजावण्यात आल्या नाहीत. गुजरातच्या शेतकºयांना जादा मोबदला आणि येथील शेतकºयांना कमी मोबदला, असा दुजाभाव कशासाठी-हिरा पाटील, स्थानिक नगरसेवक, राष्टÑवादी काँग्रेसआधी जमिनीचा पाचपट मोबदला दिला जाईल, असे सांगितले गेले. आता मोबदला दुपटीवर कसा आला, शेतकºयांना विश्वासात का घेतले जात नाही.- बाबाजी पाटील, स्थानिकनगरसेवक, राष्टÑवादी काँग्रेस
९० टक्के प्रश्न अनुत्तरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:25 AM