शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

'सैन्यदलात नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त, इच्छाशक्तीअभावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 4:55 AM

अच्युत देव : नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त

डोंबिवली : सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि देशप्रेमाची आवश्यकता असते. शारीरिकदृष्ट्या थोडी कमतरता असल्यास त्याची तयारी करता येते. आपल्याकडे सैन्यदलात भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात; मात्र देशप्रेम आणि इच्छाशक्तीचा अभाव असल्याने अनेक जण अपयशी ठरतात. त्यामुळेच सैन्यदलात कॅप्टन आणि मेजर यांच्या नऊ हजार जागा रिक्त आहेत, अशी खंत निवृत्त मेजर अच्युत देव यांनी व्यक्त केली.

सैन्यदलात जाण्यासाठी प्रेरित करण्यासाठी देव यांनी स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गणेश मंदिर संस्थान, नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फे शुक्रवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद शाळेची राणाप्रताप शाखा आणि गुरुकुल द डे स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्याशी संवाद साधताना व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाघमारे, कार्यवाह दीपक कुलकर्णी उपस्थित होते. देव यांनी १९६५ च्या लढाईतील अब्दुल हमीद यांची शौर्यगाथा सांगितली. ते म्हणाले की, सैनिकांची शौर्यगाथा महत्त्वाची असून जाज्ज्वल्य देशभक्ती महत्त्वाची असते. या देशभक्तीमुळेच पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर द्यायला सैन्यदल सक्षमपणे उभे आहे. सैन्यदलात नि:स्वार्थपणे देशभक्तीची मानसिकता असलेले तरुण हवे आहेत. त्यासाठी राष्ट्रप्रेम, प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ज्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी सैन्यदल नाही.

सरकार तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व्यवस्थित होईल, याची काळजी घेते. मला विद्यार्थ्यांना निराश करायचे नसून वास्तव सांगत आहे. एकदा सैन्यदलात करिअर निवडल्यानंतर मागे वळता येत नाही. वाघासारखे असला तरच सैन्यदलात जा. सैन्यदलात हुशारी, समन्वय, आणि मानसिकतेची गरज असते. एनडीए ही संरक्षण दलाला पूरक अशी संस्था आहे. या संस्थेत सैन्य दलासह इतरही शिक्षण पूर्ण करता येते, असे देव यांनी सांगितले.गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले, उपाध्यक्ष अलका मुतालिक, विश्वस्त मंदार हळबे, अच्युत कºहाडकर, गौरी खुंटे, संयोजन समितीचे सहसंयोजक भूषण धर्माधिकारी, चिन्मय कुलकर्णी, अनिकेत घमंडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुनील पांचाळ यांनी केले.त्यापेक्षा जास्त जीव रस्ता अपघातांत जातात!काही पालक मुलांना सैन्यदलात जाण्यापासून रोखतात. त्यांना समुपदेशनाची गरज आहे. कारगील युद्धात ५२५ जवान मारले गेले. त्यापेक्षा अधिक लोक ठाणे आणि डोंबिवलीमध्ये रस्ता अपघातांत मरतात. सैनिकाला निदान शत्रू तरी माहीत असतो; रस्ता अपघातांत मात्र आपण पूर्णपणे बेसावध असतो. देशाला तुमची गरज असून सैन्यदलात भरती व्हायला हवे, असेही देव यांनी सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीIndian Armyभारतीय जवान