शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

टीडीसीसी बँकेसाठी ९१ टक्के मतदान; आज मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 5:08 AM

शेतकऱ्यांची बँक म्हणून सुपरिचित असलेल्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या १५ संचालकांसाठी मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली.

ठाणे : शेतकऱ्यांची बँक म्हणून सुपरिचित असलेल्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या १५ संचालकांसाठी मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली. यासाठी नशीब अजमावणाऱ्या ४६ उमेदवारांना तीन हजार ६२पैकी दोन हजार ७९१ (९१ टक्के) मतदारांनी मंगळवारी मतदान केले. ३१ मार्च रोजी ही मतमोजणी येथील एम. एच. हायस्कूलमध्ये पार पडणार आहे.साडेदहा हजार कोटींची उलाढाल असलेल्या टीडीसीसी बँकेच्या २१ संचालकांसाठी ही निवडणूक पार पडली. यापैकी सहा संचालक बिनविरोध निवडून आले. उर्वरित १५ संचालकांसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीसाठी सहकार पॅनलसह महाविकास परिवर्तन पॅनेलच्या प्रत्येकी १५ संचालकांसह अपक्ष १६ उमेदवारांसाठी जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. या मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर करण्यात आला. मतमोजणी बुधवारी चार  वाजेपर्यंत पूर्ण होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी लोकमतला सांगितले. बहुजन विकास आघाडी व भाजप पुरस्कृत सहकार पॅनलच्या शिट्टी चिन्हासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या महाविकास परिवर्तन पॅनलचे कपबशी चिन्हावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ४ वाजेपर्यंतच्या चार फेऱ्यांमध्ये ९१ टक्के मतदान झाले. ठाणे व पालघर जिल्ह्यातील १८ केंद्रांवर मतदान शांततेत पार पडल्याचा दावा हौसारे यांनी केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघासह पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी पंतसंस्था, नागरी बँकांतर्फे मच्छीमार संस्था, जंगल कामगार, दुग्ध व्यवसाय संस्थांचा मतदारसंघ, खरेदी-विक्रीचा मतदारसंघ, महिला राखीव, एस.सी. व  एस.टी. मतदारसंघ, इतर मागासवर्गीय आणि विमुक्त, भटक्या जमाती सदस्यांचा मतदारसंघ आदींच्या ४६ उमेदवारांना मतदान झाले आहे. वसई तालुक्यात ८८ टक्के मतदानवसई तालुक्यात तीन ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. नालासोपारा पश्चिमेकडील समेळ पाड्यातील सोपारा इंग्लिश स्कुलमध्ये मतदान झाले. तिन्ही मतदान केंद्रावर ४ वाजेपर्यंत ८८ टक्के मतदान झाले. ठाणे-पालघर जिल्ह्यात जवळपास ३१०० च्या घरात मतदार आहेत. त्यापैकी ९४८ मते एकट्या वसई तालुक्यात आहेत. 

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक