लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘एक बुथ २५ युथ’ ही घोषणा आगामी निवडणुकीसाठी केली असून बुथपातळीवर भाजपाचा पाया भक्कम करण्यासाठी २३ कलमी कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. राज्यात अशा ९२ हजार बुथचे भाजपाने गठण केले आहे. यात ४८ विस्तारक नेमले असून त्यांच्यावर स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी सोपवल्याचे बुधवारी ठाण्यातील बैठकी दरम्यान त्यांनी सांगितले.बुथप्रमुखाने एक बुथ २५ युथ ही संकल्पना राबवायची आहे. एका बुथवर १४०० ते १५०० मतदार असतील, तर त्यालाही प्रत्येक पानासाठी एक पन्नाप्रमुख नेमून संघटनात्मक काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केल्याचे ते म्हणाले. राज्यभर पहिल्या आढावा बैठकीत या २३ कामांचे वाटप केले जात आहे. दुसऱ्या बैठकीतून ही कामे झाली की नाही, ते पाहिले जात आहे. आतापर्यंत उत्तर महाराष्टÑ, यवतमाळ, बुलडाणा आदी जिल्ह्यांमध्ये आढावा घेण्यात आला आहे. तिथे पदाधिकाºयांचे काम समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.................................बुथ सक्षम कराप्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील सभागृहात दानवे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून कामाला लागा. बुथ सक्षम करून संघटनात्मक कामावर भर देऊन भाजपाची ताकद वाढवा. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. बुथपातळीवर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून या योजनांचा प्रचार करण्याचेही त्यांनी कार्यकर्त्यांना बैठकीद्वारे आवाहन केले. भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, ठाण्याचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आदींसह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.