लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह ६४४ अधिकारी आणि सात हजार ८४८ कर्मचारी अशा आठ हजार ४९२ पोलिसांनी म्हणजे एकूण पोलीस दलापैकी ९३ टक्के पोलिसांनी कोरोनावरील लस घेतली आहे. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात ठाणे शहर पोलिसांनी कठोर परिश्रम घेत बंदोबस्त केला. या काळात कर्तव्यावरील २३८ अधिकारी आणि एक हजार ७८८ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले. यात ३५ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आठ हजार ४७६ इतकी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या असून त्यातील सात हजार ८४८ पोलिसांनी कोरोनावरील पहिला डोस घेतला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेखला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार, संजय येनपुरे, विशेष शाखेचे पोलीस आयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि मुख्यालयाचे उपायुक्त गणेश गावडे यांच्यासह आयुक्तालयातील ६४४ अधिकाऱ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
पूर्वी कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतांना पोलिसांमधील बाधितांची संख्याही वाढत होती. तेंव्हा २०० कर्मचारी रुग्णालयात दाखल असतांना २५ अतिदक्षता विभागात होते. आता लसीकरणामुळे ३४ बाधित असून त्यातील केवळ २५ पोलिसांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. लसीकरण, सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराचा हा परिणाम असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ठाणे आयुक्तालयात एकूण पोलीस - ८,४७६
लस घेतलेले पोलीस -७,८४८
आयुक्तालयात एकूण पोलीस अधिकारी - ७१०
लस घेतलेले पोलीस अधिकारी - ६४४
* ५२ टक्के पोलिसांनी घेतला दुसरा डोस
ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांसह मुख्यालयातील आठ हजार ४९२ पोलिसांनी पहिला डोस घेतला आहे. त्यातील ३४६ अधिकारी आणि चार हजार २८६ कर्मचारी अशा चार हजार ६३२ पोलिसांनी कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतला. हे प्रमाण एकूण पोलिसांच्या ५१ टक्के आहे.
*९० टक्के महिला पोलिसांनी घेतली लस
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मुख्यालयासह २०५ महिला अधिकारी असून त्यातील १७५ अधिकारी महिलांनी लस घेतली आहे. तर दोन हजार ५४३ महिला अंमलदार असून त्यातील दोन हजार २८० महिलांनी कोरोनावरील लस घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ९० पेक्षा अधिक म्हणजे ४८ टक्के महिला पोलिसांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला.
.............
‘‘ चार महिन्यांपूर्वीच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी यांची कोरोनावरील लसीची नोंदणी झाली होती. फ्रंटलाइन वर्करला लसीकरण सुरू झाल्यानंतर पोलीस आयुक्तांसह सुमारे ९३ टक्के पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ५१ टक्के पोलिसांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्हा रुग्णालय आणि पालिकेच्या रुग्णालयात जाऊन पोलिसांनी हे लसीकरण केले. ’’
- प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन)
................
टेम्पलेट आहे
............
वाचली