शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Mira Bhayander | मीरा भाईंदरमध्ये ९५० कोटींच्या कचरा संकलन, वाहतूक ठेक्याचा वाद उच्च न्यायालयात

By धीरज परब | Published: December 22, 2022 9:46 PM

साफसफाई कचरा संकलनसाठी पालिकेने काढल्या होत्या ९ वेळा निविदा

भाईंदर: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या दैनंदिन साफसफाई व कचरा संकलन वाहतूक करणे कामी ५ वर्षांच्या तब्बल ९५० कोटी रुपयांच्या ठेक्या विरोधात आमदार गीता जैन सह अनेकांच्या तक्रारी होत आहेत. तर एका ठेकेदारानेच महापालिकेच्या निविदा प्रक्रिये विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने कार्यादेश देण्यास स्थगिती देण्याची याचिकाकर्त्याची मागणी मान्य केली नसली, तरी पालिकेस म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. २०१२ साली महापालिकेनी मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट ह्या ठेकेदाराला पाच वर्षासाठी साफसफाई व कचरा वाहतूकचा ठेका दिला होता. २०१७ साली ठेका संपल्यानंतर देखील आजपर्यंत तत्कालीन नगरसेवक व प्रशासनाने ठेकेदारास अनेकवेळा मुदतवाढ दिली.

साफसफाई व कचरा संकलनसाठी पालिकेने ९ वेळा निविदा काढली होती. यावेळी पालिकेने प्रभाग समिती १ ते ३ करिता झोन १ तर प्रभाग समिती ४ ते ५ करिता झोन २ अशी विभागणी केली. पालिकेने मागवलेल्या निविदानुसार प्रत्येक झोनसाठी ४ निविदा आल्या होत्या. त्यातील झोन १ साठी पालिकेने ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट तर झोन २ साठी कोणार्क इन्फ्रा ह्या ठेकेदारांची निवड केली. झोन एक मध्ये ९०० सफाईक कामगार व तर न दोन मध्ये १३०० सफाईक कामगार असतील . पालिकेनी निविदेत प्रति सफाई कामगार यांचा दर १२४९ दिलेला होता . परंतु ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटने १४९४ रुपये तर कोणार्क इन्फ्रा यांनी १५०२ रुपये प्रति कामगार प्रति दिवस असा दर भरला होता. पालिकेच्या वाटाघाटी दरानंतर दोन्ही ठेकेदारांनी प्रति कामगार १३९९ रुपये असा दर निश्चित केला आहे.

पालिकेची २४ कचरा वाहक  वाहने असून आणखी नवीन येणारी वाहने सुद्धा ठेकेदारांना दिली जाणार आहेत. त्यात तीन कामगार व एक चालक सह वाहनाची देखभाल दुरुस्ती, इंधन आदी सर्व खर्च ठेकेदाची जबाबदारी असणार आहे . ठेकेदारा कडून वाहने घेतल्यास ७ टनाच्या कॉम्पॅक्टर साठी १४ हजार ४०० रुपये आणि ५ टनाच्या साठी १३ हजार २०० तर  ३.३ टनाच्या ७२०० रुपये प्रति दिवस असा दर असणार आहे. ५ वर्षांसाठीचा हा ठेका असून पहिल्या वर्षात झोन एक साठी ६३ कोटी आणि झोन दोन साठी ९३ कोटी रुपये ठेकेदारास अदा केले जातील . त्यात दरवर्षी त्यात १० टक्के रक्कम वाढवून ठेकेदारास दिली जाणार असून ५ वर्षाची एकूण रक्कम ९५० कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे.

दरम्यान, पालिकेच्या निविदा प्रक्रिया व ठेका मंजुरी विरोधात आर अँड बी इन्फ्रा ह्या स्पर्धेतील ठेकेदाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट ला काम देऊ नये असा मुंबई पालिकेचा निर्णय असताना मीरा भाईंदर महापालिकेने त्यास पात्र ठरवलेच शिवाय ग्लोबल ने झोन दोन मधून  तांत्रिक लिफाफा उघडल्या माघार घेण्याचे पत्र दिले . पालिकेने ते मान्य करून त्याचा फायदा कोणार्क इन्फ्रा ह्या ठेकेदारास करून देण्यात आला . तर मे. कोणार्क इन्फ्रा हा ठेकेदार निविदेच्या अटीशर्तीत बसत नसतानाही त्याने दुसऱ्या कंपनीची अनुभवाची कागदपत्रे जोडल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर