शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

ठाणे जिल्ह्यात सोमवारी ९६७ कोरोनाचे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 3:32 AM

कल्याण-डोंबिवलीत २५० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता २४ हजार ६७० बाधित झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या ५०३ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ९६७ रुग्ण नव्याने आढळल्याने रुग्णसंख्या एक लाख सात हजार ५३३ झाली आहे. तर, ३७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तीन हजार ७५ वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.सोमवारी १९३ नवे रुग्ण सापडल्यामुळे बाधितांची संख्या २३ हजार ४८८ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत २५० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता २४ हजार ६७० बाधित झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या ५०३ झाली आहे.नवी मुंबईत २४० रुग्णांची नोंद झाली आहे. उल्हासनगरला ३८ रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात सोमवारी फक्त चार रुग्ण सापडले आहेत. अंबरनाथ शहरात २१ रुग्ण नव्याने आढळले असून दोन मृत्यू झाले आहेत. बदलापूरमध्ये ५५ रुग्ण वाढले. यामुळे बाधित रुग्ण तीन हजार ४८४ झाले आहेत.>रायगडमध्ये१८५ नवे रु ग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी १८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या २० हजार ९२५ वर पोहोचली आहे. १७ हजार ५२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ७२, पनवेल ग्रामीणमध्ये२० रुग्ण सापडले आहेत. पनवेल महानगरपालिका १७७, पनवेल ग्रामीण ३३, उरण १३, खालापूर १७, कर्जत १०, पेण १७, अलिबाग २२, असे एकूण ३३८ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.>वसई-विरारमध्ये११६ रुग्ण कोरोनामुक्तवसई : वसई-विरार शहरात सोमवारी ११६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले. यामुळे ११ हजार ९६२ रुग्णांनी आजवर कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, दिवसभरात ६९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या