ठाणे : जिल्ह्यात प्रथमच तीन महिन्यांनंतर कोरोनाचे नऊशेहून कमी ८९८ रुग्ण आढळले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख दोन हजार ६३३ रुग्ण झाले आहेत. तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार १३५ झाली आहे.
ठाण्यात २१३ रुग्ण नव्याने आढळले आहेत. तर मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण - डोंबिवली शहरात १६७ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरात ४२ नवे रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरात ३२ बाधित आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये ११ रुग्णांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये ३० रुग्ण नव्याने वाढले आहेत. तर एकही मृत्यू झाला नाही. बदलापूरमध्ये २९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या सात हजार १७ झाली आहे. या शहरात तीन मृत्यू झाले आहेत. तर नवी मुंबईत रुग्ण वाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. मंगळवारी २०९ रुग्ण वाढले असून २७९ रुग्ण बरे झाले आहेत. तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रायगडमध्ये १८१ कोरोना रु ग्णरायगड जिल्ह्यात मंगळवारी १८१ नव्या रुग्णांची नोंद झाल. दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला तर २६६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
वसई-विरारमध्ये ११४ नवीन रुग्णवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत मंगळवारी दिवसभरात ११४ नवीन रुग्ण आढळून आले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून १८५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. तर शहरांत १ हजार १६० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.