मीरारोड - भाईंदर पश्चिमेस खाऊ गल्लीच्या ग्रेसी इमारतीत ८५ वर्षांचे सत्यनारायण अग्रवाल हे त्यांची पत्नी , मोठी सून सविता (४८) , लहान मुलगा अरुण (४७) व त्याची पत्नी अमिषा ( ४४) आणि नातू वंश ( २० ) असे राहतात . सत्यनारायण यांची पत्नी आजारी असून अंथरुणाला खिळलेली असल्याने चालता येत नाही .
परंतु सविता , अरुण , अमिषा आणि वंश हे वृद्ध सत्यनाराण आणि त्यांच्या पत्नीला सातत्याने शिवीगाळ, मारहाण करतात व जीवे मारण्याच्या धमक्या देतात . त्यांना जेवण देत नाहीत व त्यांची देखभाल करत नाहीत . कोणत्या ना कोणत्या कारणावरून छळ करतात , त्रास देतात अशी फिर्याद सत्यनाराण यांनी भाईंदर पोलिसात दिली .
पोलिसांनी बुधवारी सविता , अरुण , अमिषा आणि वंश यांच्यावर भादंवि तसेच ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे . उपनिरीक्षक अनिल करे हे पुढील तपास करत आहेत .