उल्हासनगर: कॅम्प नं-२ लिंक रोड कोणार्क बँकेसमोर दोन अज्ञात इसमानी राष्ट्रवादीचे कारी माखिजा यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडे सात वाजता घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अवैध धंदे व वाढीव बांधकामाच्या तक्रारीवरून हल्ला झाल्याची प्रतिक्रिया माखिजा यांनी दिली.
उल्हासनगर लिंक रोड कोणार्क बँक येथून शनिवारी सायंकाळी साडे सात वाजता लकी उर्फ कारी माखिजा आपल्या मित्रा सोबत मोटरसायकलवरून जात होते. त्यावेळी मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी माखिजा यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. माखिजा याने शेजारील दुकानाचत आश्रय घेतल्याने जीव वाचला. त्यांच्यावर टोपीवाला हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून हात व पायाचे हाड मोडल्याचे त्यांनी सांगितले. शहरात अवैध धंदे व अवैध बांधकामाला ऊत आला असून यातून तरुण पिढीचे जीवन खराब होत आहे. याबाबत महापालिका व पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली असून यातूनच आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप माखिजा यांनी केला.
शहरात अवैध धंदे व अवैध बांधकामाला ऊत आला असून यांची तक्रार करणाऱ्यावर हल्ले करण्याची मजल त्यांची गेली. असा आरोप माखिजा यांनी केला. भविष्यात आजच्या सारखे इमारतीचे स्लॅब कोसळून नागरिकांचे बळी जाऊ नये. व तशी परिस्थिती होऊ नये, म्हणून अवैध बांधकामाची तक्रार केल्याची कबुली माखिजा यांना दिली. २ मजल्याच्या बांधकाम परवान्यावर १० मजली इमारत उभी राहूनही पालिका प्रशासन व राजकीय नेते बघायची भूमिका घेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उल्हासनगर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे तपास सुरू केला असुन हल्लेखोर लवकरच गजाआड असतील. अशी प्रतिक्रिया उल्हासनगर पोलिसांनी दिली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फुलपगारे करीत आहेत.