मीरारोड - भाईंदरच्या चौकी जेट्टी आणि धारावी किल्ल्या दरम्यान समुद्र व खाडीच्या संगमावर असलेल्या कांदळवनची कत्तल केल्या प्रकरणी महसूल विभागाने उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
येथील कांदळवनची मोठमोठी झाडे मोठ्या कटर ने कापून समुद्राच्या पाण्यात टाकून देण्यात आली होती. स्थानिक मच्छीमारांसह किल्ला संवर्धन समिती चे रोहित सुवर्णा, श्रमजीवीचे संघटनेचे वसीम पटेल , मनोज राणे आदींनी या बाबत तक्रारी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती .
प्रांत अधिकारी अविनाश शिंदे व अपर तहसीलदार निलेश गौंड यांच्या निर्देशक नंतर कांदळवन विभागाने तलाठी आदींसह पाहणी करून अहवाल दिला होता . येथील ८ ते १० जुनी - मोठी कांदळवन ची झाडे तोडल्या प्रकरणी तलाठी रमेश फाफाळे यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर अनोळखी व्यक्तीं विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या भागातील सीसीटीव्ही तपासणीची तसेच कांदळवन लागवडीची मागणी होत असून कांदळवन तोडून जागा मोकळी करत त्याचा वापर करणाऱ्यांवर संशय आहे .