सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी महिला लिपिकासी अश्लील बोलणे व अंगलट केल्याच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला. तर जाहिरात घोटाळा बाहेर काढल्याच्या दबावातून महिला लिपीकेने हे कुभांड रचल्याची प्रतिक्रिया लेंगरेकर यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका महिला लिपिक नवऱ्याच्या जागी अनुकंप्पातत्वावर नोकरीला लागली. यापूर्वी जमीर लेंगरेकर हे उपायुक्त पदी असतांना महिला लिपिक व लेंगरेकर यांची महापालिका कामानिमित्त ओळख होती. त्यानंतर लेंगरेकर यांची बदली झाली होती. मात्र सन २०२२ साली लेंगरेकर यांची महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती झाली. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा पदभार असल्याने, लिपिक महिला व लेंगरेकर यांचा महापालिका कामानिमित्त पुन्हा संबंध आले. ४ एप्रिल २०२२ ते २० जुलै २०२३ दरम्यान महिला लिपिकाला कामानिमित्त सतत बोलाविणे, तू छान दिसते, छान कपडे आहेत. असा त्रास देऊन लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कल्याण पनवेल येथील हॉटेल मध्ये चल मजा करू, असे बोलल्याचा आरोप महिलेने केला. याबाबत राष्ट्रीय महिला आयोग, महापालिकेच्या विशाखा समितीकडे महिलेने तक्रार केली.
दरम्यान वडिलांची तब्येत ठीक नसल्याने, याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यास विलंब झाल्याचे महिला लिपिकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. मंगळवारी रात्री उशिरा महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३५४, ३५४ (अ) ५८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. याप्रकाराने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. महापालिकेचा जाहिरात घोटाळा बाहेर काढल्याने, माझ्या विरोधात महिलेने छडयंत्र रचल्याचा आरोप केला. अशी प्रतिक्रिया लेंगरेकर दिली आहे. महिला लिपिकाने याप्रकरणी विशाखा समितीत तक्रार केली होती. विशाखा समितीचा अहवालाचे झाले काय? हा प्रश्न आजही कायम आहे.
विशाखा समितीचे पुनर्गठन
महिला लिपीकेच्या तक्रारीनंतर समितीच्या काही सदस्यांनी राजीनामा दिले होते. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी विशाखा समिती बरखास्त करून समितीचे पुनर्गठन केले. समितीच्या अध्यक्षपदी थेट सीएचएम कॉलेजच्या प्राचार्याना नियुक्त केले.
लेंगरेकर यांच्या कारकिर्दीला ग्रहण
महापालिकेत स्वच्छ प्रतिमेचे व कार्यक्षम अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची ओळख होती. महिला लिपिकासह अन्य दोन महिला कर्मचाऱ्यांनीही विशाखा समितीकडे लेंगरेकर यांच्या विरोधात तक्रार केल्याचे बोलले जाते.