सदानंद नाईक , लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : कॅम्प नं-३ परिसरात एका इसमाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून, तिचा गर्भपात केल्याचा प्रकार डॉक्टरांच्या सतर्कमुळे उघड झाला. याप्रकरणी ३२ वर्षीय इसमासह त्याची पत्नी, मेव्हणी व आई आदी चार जणांंवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-३, परिसरातील ३२ वर्षीय इसमाने शेजारीच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने, ती ७ महिन्याची गर्भवती राहिली. याबाबत कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून सागर ढेमढेरे यांनी अन्य जणांच्या मदतीने मुलीचे खोटे नाव व वय जास्त सांगून मध्यवर्ती रुग्णालयात भरती करून गर्भपात केला. मात्र डॉक्टरांना याबाबतचा संशय आल्याने, त्यांनी मध्यवर्ती पोलिसांना माहिती दिली. त्यादरम्यान पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठून मुलगी घरी आली नसल्याची माहिती पोलिसांना दिली. आदीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली. याप्रकरणी सागर ढमढेरे याच्यासह त्याला मदत करणारी त्याची पत्नी, मेव्हणी व आई यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली.
मध्यवर्ती रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा गर्भपात करून ७ महिनेचे अर्भक आरोपी यांनी स्मशानभूमीत पुरले होते. पोलिसांनी पुरलेले अर्भक जमिनीबाहेर काढून शव डीएनए तपासणीसाठी पाठवून दिले. अधिक तपास सुजित मुंढे यांच्या कडे सोपविण्यात आले आहे. अधिकारी तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहे.