ठाणे : बाळकुम अग्निशमन केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ब्रह्मांड फेज ३ मधील रेम्बो शाळेजवळच्या बिल्डिंग नंबर बी.३ मधील चौथ्या मजल्यावरील रूमला आग लागली हाेती हाेती. रहिवाशी निलेश फळेकर यांच्या मालकीचा हा रूम आहे. अचानक लागलेल्या या आगीत रूम क्रमांक ४०४ मधील चांदी, सोन्याचे दागिने, कपाट, गादी, वॉशिंग मशिन, बेड, शोकेश कपाट, इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाली, याशिवाय किचन मधील काही साहित्य व हॉलमधील काही साहित्य जळाले आहे.
या आगी दरम्यान इमारतीमध्ये अडकलेल्या सुमारे दहा रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांच्या यांचे मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे. इमारत तळ अधीक सात मजली आहे. इमारतीत प्रत्येक मजल्यावर चार रूम आहेत. याप्रमाणे ३२ रूममध्ये रहिवाशी वास्तव्याला आहे. यातील चाैथ्या मजल्यावरील ही आग विझवण्यात यश आले आहे.
आग लागलेल्या रूम मधून सुमारे २५ हजार रूपयांची कॅश व काही दागिने कासारवडवली पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रूम मालकाच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या आगीच्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्यामदतीने सुमारे दाेन तासाच्या प्रयत्नानंतर पूर्णपणे विझविण्यात आली आहे.