उल्हासनगर: शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख बाळा श्रीखंडे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांना जीवना आवश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी लहान मुलांनी भजन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
उल्हासनगरातून नाशिक आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुले शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या मुलांना मदतीचा हात दिला जातो. शिवसेना शिंदे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमा अंतर्गत आधारतीर्थ आश्रमातील मुलांना बोलाविण्यात आले. यावेळी आमदार बालाजी किणीकर, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थित उपशहरप्रमुख बाळा श्रीखंडे यांच्यासह अन्य जणांनी मुलांना गहू, तांदूळ, डाळी, तेल, कपडे आदी जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात वस्तू देण्यात आल्या. आश्रमाला शासन अनुदान नसल्याने, दानशूर व्यक्तीवरच आश्रम चालत असल्याची माहिती आश्रमाच्या व्यवस्थापकांनी दिली. यावेळी आश्रमाला अनुदान देण्याची फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे असून आश्रमाला नक्कीच अनुदान मिळेल. अशी माहिती आमदार किणीकर यांनी दिली. आश्रमातील मुला-मुलींनी भजन-कीर्तन गाऊन उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. शहरातील अनेक दानशूरानीही आश्रमातील मुलांना जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत.