ठाणे : लग्नाच्या भूलथापा देऊन एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा?्या सागर सुदाम जाधव (२३, रा. कोकणीपाडा) याला अटक केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वर्तकनगर भागात राहणाºया १७ वर्षांच्या मुलीशी सागरने आधी मैत्री केली. नंतर तिला त्याने लग्न करण्याचे वचन दिले. त्यानंतर १४ मार्च २०२० रोजी दुपारी २ ते २१ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान त्याने वेळोवेळी कोकणीपाड्यातील त्याच्या घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मात्र, त्यानंतर त्याने तिच्याशी लग्नास नकार दिला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने २ फेब्रुवारी २०२३ रोजी चितळसर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, अटकेच्या भीतीने सागर याने घरातून पळ काढला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राघू भिलारे आणि सहायक पोलिस निरीक्षक अजय गंगावणे यांच्या पथकाने ८ फेब्रुवारीला सागर याला अखेर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.