शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

लोकअदालतमध्ये पुन्हा रचला नवा इतिहास, ठाण्यात साडेचार कोटींची झाली तडजोड

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 28, 2024 17:45 IST

गेल्यावर्षी एका प्रकरणात २ कोटी ८५ लाखांची मदत लोकन्यायालयाने मिळवून दिली होती.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लोक न्यायालयात पुन्हा एकदा नवा इतिहास रचला गेला. टँकरच्या धडकेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना एका खाजगी इन्शुरन्स कंपनीकडून साडेचार कोटींची मदत मिळवून देण्यात ठाणे लोकन्यायालयाला यश आले. मोटार अपघात प्राधीकरणाकडे हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. हा दावा शनिवारी मोटार अपघात प्राधीकरणाचे सदस्य, न्यायमूर्ती एस. एन. शाह यांच्या कोर्टात निकाली काढण्यात आला. गेल्यावर्षी एका प्रकरणात २ कोटी ८५ लाखांची मदत लोकन्यायालयाने मिळवून दिली होती.

अपघातात मृत पावलेली व्यक्ती (वय ३७ वर्षे) ही व्यवसायाने कम्पुटर इंजिनिअर होती आणि ती कांजुरमार्ग येथील एका खाजगी कंपनीत कामाला होती आणि काही दिवसांनी ते याच कंपनीच्या अमेरिका येथील कार्यालयात रुजू होणार आहे. मात्र त्या दरम्यान त्यांचा अपघात झाला. नावडा फाटा येथे ९.१२.२०२२ रोजी सकाळी ७.२० वाजता ते मासळी घेण्यासाठी स्कुटरवरुन जात असताना पाठीमागून एका सिमेंटच्या टँकरने धडक दिली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी ॲड. जी. ए विनोद यांच्या माध्यमातून मोटार अपघात प्राधीकरणाकडे एका खाजगी इन्शुरन्स कंपनीकडे दावा दाखल केला. ॲड. विनोद यांंनी फक्त भरपाई म्हणून दावा दाखल केला. हे प्रकरण आज निकाली काढून ती अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना मिळवून देण्यात आले. या प्रकरणात इन्शुरन्स कंपनीचे अमृता सिन्हा आणि स्वप्निल पिंपळखरे यांनी देखील मेहनत घेतली.

शनिवारी लोकन्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन शिरसिकर, मुख्य न्यायदंडाधिकारी, ठाणे एस के फोकमारे, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे सदस्या, न्यायमुर्ती एस एन शाह , प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी सुतार, के एस कातकाडे, पुजा माने, एस जी. खेतवाल यांच्या उपस्थितीत या रक्कमेचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघात