शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

दुर्दैवी! भिवंडीत आदिवासी पाड्यातील गरोदर महिलेची झोळीत प्रसूती; रुग्णलयात पोहोचेपर्यंत बाळ दगावले

By नितीन पंडित | Published: September 03, 2022 8:45 PM

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही दुर्दैवी घटना सर्वांसमोर आली आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी:भिवंडी वाडा मार्गावरील दिघाशी गावातील धर्मिचा पाडा ह्या पाड्यातील एका गरोदर मातेला मुख्य रस्त्यावर आणून रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने थेट चादरीच्या झोळीतून घेऊन जात असताना झोळीतच गरोदर महिलेची प्रसूती होऊन बाळ दगावण्याची घटना गुरुवारी घडली आहे. शनिवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हि दुर्दैवी घटना सर्वांसमोर आली आहे.          दर्शना महादू फरले असे या दुर्दैवी माहिलेचे नाव आहे.एक सप्टेंबर रोजी या महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्याने महिलेला वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी स्थानिक नागरिकांनी चादरीची झोळी करून माहिलेले दवाखान्यात नेले.मात्र रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाली आणि या महिलेचा बाळ दगावला असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी जाहीर केले.           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच हि भीषण परिस्थिती असून वारंवार घडणाऱ्या या घटनांतून आतातरी आमची सुटका होणार का आणि आमच्या आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी आतातरी रस्ता बनणार का की अजूनही आम्हाला अशा चिमुकल्या जीवांना मुकावे लागेल अशी संतप्त येथील नागरिकांकडून येत आहे. 

मागील वर्षी २२ सप्टेंबर २०२१ रोजी धर्मी आजी नावाच्या वृद्ध महिलेचा पाय तुटल्याने या वृद्ध महिलेला स्थानिक नागरिकांनी अशाच प्रकारे लोखंडी पलंगावरूनच या रस्त्यातून रुग्णालयात औषधोपचार करण्यासाठी नेले होते.धर्मी आजी यांच्या नावावरूनच या आदिवासी पाड्याला धर्मीचा पाडा हे नाव पडले आहे.या घटनेनंतर गेल्या वर्षीपासून श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते प्रमोद पवार यांनी धर्मीचा पाडा या आदिवासी पाड्यावरून मुख्य रस्त्यापर्यंतचा रस्ता शासन यंत्रणेने बनवावा या संदर्भात तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह संबंधित यंत्रणांना पत्रव्यवहार केला होता.मागील एक वर्षापासून या रस्त्या संदर्भातील पाठपुरावा श्रमजीवीचे कार्यकर्ते करत असताना देखील शासन यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच या घटना वाढत असून आता पुन्हा एकदा एका महिलेला आपले मूल गमवावे लागले आहे त्यामुळे अशा घटना वारंवार झाल्यास त्यास जबाबदार कोण आणि शासकीय यंत्रणांचे या आदिवासी पाडायच्या सोयी सुविधांकडे आता तरी लक्ष जाणार का ? असा सवाल येथील नागरिक शासकीय यंत्रणेला विचारत आहेत.देश स्वतंत्र होऊ ७५ वर्ष झाली तरी आदिवासी बांधव अजूनही खऱ्या अर्थाने स्वातंत्र झाला नाही अशीही संतप्त प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांमधून येत आहे.

या महिलेच्या प्रसूती वेदना वाढल्यामुळे तिला रुग्णालयात नेणे गरजेचे होते मात्र मुख्य रस्त्यापासून धर्मीचा पाडा येथील अंतर एक ते दीड किलोमीटर असून या पाड्यावर यायला व जायला रस्ता नसल्याने त्या महिलेला आम्ही झोळीतून घेऊन गेलो मात्र रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाली व त्यानंतर आम्हाला समजले की बाळ दगावले आहे,आमच्या पाड्यावर रस्त्याची सुविधा असती तर हे बाळ दगावले नसते आमच्या पाड्यावर अशा प्रकारे गरोदर महिला अथवा रुग्णांना नेहमीच अशा प्रकारे झोळीतच न्यावे लागते मात्र शासन यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत आहे अशी प्रतिक्रिया धर्मीचा पाडा येथील आदेश रायात या तरुणाने दिली आहे.

गरोदर महिला ही २४ ऑगष्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आली होती ,तिची प्रकृर्ती उत्तम होती परंतु पाड्यावर जाण्यासाठी पाऊस पडला की रस्ता नसल्याने महिलेस चार दिवस आधी रुग्णालयात दाखल होण्याची सूचना केली होती परंतु घरात लहान मुले असल्याने तिने येणे टाळले.स्थानिक आशा वर्कर्स या गरोदर महिलेच्या सतत संपर्कात होती.मात्र महिलेस अचानक प्रसूती वेदना झाल्याने या महिलेला स्थानिकांनी झोळीतून आणले आणि वाटेतच तिची प्रसूती झाल्याने महिलेचे बाळ दगावले आजच या महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात अले असल्याची माहिती वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ माधव कवळे यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेBhiwandiभिवंडी