शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या धार्मिक शिक्षकाला सश्रम कारावासाची शिक्षा

By जितेंद्र कालेकर | Published: August 24, 2023 8:36 PM

ठाणे न्यायायालयाचा निकाल

ठाणे: मदरसामध्ये शिक्षण घेणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मोहम्मद सरताज शेख (३५, रा. मुंब्रा , ठाणे)या धार्मिक शिक्षकाला (मौलाना) ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ५० दिवसांच्या साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षाही आरोपील भोगावी लागणार आहे.

पीडित मुलगी ही १६ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंब्रा भागातील एका मदरसामध्ये अरबी शिक्षणासाठी गेली होती. त्यावेळी मोहम्मद शेख या मौलानाने या मुलीची लैंगिक छळवणूक करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पिडितेने याबाबतची माहिती दिल्यानंतर मुलीच्या आईने या मौलानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो तिथून पसार झाला होता. 

याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो अंतर्गत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्हयात मुंब्रा पोलिसांनी शेख याला अटक केली होती. सरकारी अभियोक्ता रेखा हिवराळे यांनी या खटल्यामध्ये पिडितेची बाजू मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि विशेष न्यायाधीश पोक्सो व्ही. व्ही. विरकर यांनी आरोपीला २४ ऑगस्ट रोजी पाच वर्षांची शिक्षा सुनावली. पोलिस नाईक विद्यासागर कोळी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय