शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

उद्यान विभागातील ठेका कामगारांच्या मागण्यांसाठी मीरा भाईंदर महापालिकेविरुद्ध अर्धनग्न आंदोलन

By धीरज परब | Published: August 12, 2024 7:27 PM

पालिका मुख्यालया बाहेर ठिय्या देत कामगारांनी घोषणाबाजी केली . श्रमजीवीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांची भेट घेऊन चर्चा केली

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान विभागातील ठेका कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या मागण्या सातत्याने डावलल्या जात असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिके बाहेर उघडे राहून आंदोलन केले . प्रशासनाने १५ दिवसात कामगारांच्या मागण्यां बाबत ठेकेदाराशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे . 

महापालिकेच्या उद्यान आणि वृक्षप्राधिकरण विभागात ठेकेदारां मार्फत ठेक्याचे कामगार काम करतात . ठेकेदार मे . हिरावती एन्टरप्रायझेस यांचा किमान वेतन कायद्यानुसार वाढीव डीए चा फरक देणे आहे . मे . निसर्ग लँड्सकॅप ह्या ठेकेदाराने २०२१ ते २०२४ पर्यंतचा किमान वेतन कायद्या नुसार डीए चा फरक व सुट्टीचा पगार दिलेला नाही . उद्यान विभागात काम करणाऱ्या कामगारांना पावसाळी सॅन्डल आदी दिलेले नाही

कामगारांच्या ह्या मागण्यासाठी श्रमजीवी संघटनेने महापालिकेस अनेकदा पत्रव्यवहार केले होते . अधिकाऱ्यांना भेटून कामगारांना त्यांचा हक्क देण्याची मागणी केली होती . परंतु ठेकेदार आणि पालिका कामगारांना दाद देत नसल्याने सोमवार १२ ऑगस्ट रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्याचे श्रमजीवी संघटनेने जाहीर केले होते . 

संघटनेचे संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष विवेक पंडित व कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील, मीरा भाईंदर अध्यक्ष मंगेश मोरे ,शहर अध्यक्ष वसिम पटेल,  उपाध्यक्षा जयश्री पाटील सह श्रमजीवीचे कार्यकर्ते - पदाधिकारी व कामगारांनी सोमवारी पालिके बाहेर आंदोलन केले . पुरुष पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंगावरचे शर्ट - बनियान काढून उघडे राहून आंदोलन केले . 

पालिका मुख्यालया बाहेर ठिय्या देत कामगारांनी घोषणाबाजी केली . श्रमजीवीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांची भेट घेऊन चर्चा केली . सुरवातीला प्रशासनाने प्रलंबित मागण्यांसाठी ४५ दिवसांची मुदत मागितली होती . परंतु विवेक पंडित यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा झाल्या नंतर प्रशासनाने १५ दिवसात कामगारांच्या मागण्यां बाबत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे . त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले . महापालिकेने लेखी दिल्या नुसार जर १५ दिवसांत कामगारांना त्यांचा हक्क दिला नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल . पण त्या आंदोलनात कामगार स्वतःचे कपडे उतरवणार नाहीत , तर हक्का साठी ठेकेदार आणि पालिकेची लक्तरे श्रमजीवी संघटना वेशीवर टांगेल असा इशारा श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी दिला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक