शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले, महापालिका आयुक्तांचे आदेश

By अजित मांडके | Published: February 20, 2023 4:23 PM

Thane: कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे.

- अजित मांडकेठाणे - कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. तसेच, या काळात त्यांना ठाणे महापालिकेच्या इतर कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचबरोबर, या कामाची पर्यवेक्षणीय जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाबवण्यात आली आहे.

ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे अष्टविनायक चौक येथे गेले काही महिने रस्त्याचे काम सुरू होते. स्थानिक नागरिकांचे या कामाकडे बारीक लक्ष होते.रस्त्याचे काम कमी दर्जाचे होत असल्याचे तेथील एका नागरिकाने महापालिका बांगर यांच्या निदर्शनास आणून दिले. काम खराब होत असल्याची त्या नागरिकाने तक्रार केली. संबंधित कामाची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंत्याला आयुक्तांनी पाहणी करण्यास सांगितले. त्यावर, कंत्राटदाराने न सांगताच हे काम केले आहे. शिवाय त्याची आता दुरुस्तीही केली आहे, असा अहवाल सादर केला. मात्र, तक्रारदाराने त्याचा पाठपुरावा कायम ठेवला. कामाच्या दर्जाबाबत त्याचे म्हणणे कायम राहिल्याने, आयुक्तानी अष्टविनायक चौक येथील रस्त्याच्या कामाला अचानक भेट दिली. या भेटीत, रस्त्याचे काम योग्य दर्जाचे नसल्याचे त्यांच्याही निर्दशनास आले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आयुक्तांची भेट घेतली. कामाच्या दर्जाबद्दल त्यांना वाटणारी चिंता त्यांनी आयुक्तांकडे व्यक्त केली. तसेच, अनेकदा तक्रारी करूनही संबंधितांनी त्यात लक्ष न घातल्याची खंतही व्यक्त केली.

या रस्त्याचे काम मास्टिक प्रकारचे असून या कामात डांबराचे तापमान योग्य न राखल्यास रस्त्याचा पृष्ठभाग लवकर उखडतो. परंतु, तांत्रिकदृष्ट्या योग्य काम झाल्यास किमान दहा वर्षे हा रस्ता खड्डेमुक्त राहू शकेल, अशी खात्री दिली जाते. अष्टविनायक चौकातील मूळ रस्ता खराब झालाच, शिवाय त्याची दुरुस्तीही नीट झाली नाही. याची दखल घेत, त्या कंत्राटदाराला खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले. कंत्राटदाराने असमाधानकारक खुलासा केला. त्यामुळे त्याला काळ्या यादीत का टाकू नये, अशी नोटीस बजावण्यात आली. या नोटीशीच्या उत्तरात त्याने मूळ काम आणि त्याची दुरुस्ती खराब असल्याचे मान्य केले.

या पार्श्वभूमीवर, कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकणे, तसेच, ठाणे महापालिकेच्या इतर निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून प्रतिबंध घालण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. संबंधित कामाच्या पर्यवेक्षणाची  जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे