शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Crime: राष्ट्रीय बालिका दिवसाच्या पूर्वसंध्येलाच तीन वर्षाच्या चिमुरडीची लैंगिक अत्याचार करून हत्या, नराधमास अटक

By नितीन पंडित | Published: January 23, 2023 5:04 PM

Crime News: भिवंडीत एका विकृत नराधमाने तीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करीत हत्या केल्याची घटना शहरालगतच्या काटई गावात रविवारी घडली असून याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या पाच तासात नराधमास अटक केली.

- नितीन पंडितभिवंडी - भिवंडीत एका विकृत नराधमाने तीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करीत हत्या केल्याची घटना शहरालगतच्या काटई गावात रविवारी घडली असून याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या पाच तासात नराधमास अटक केली आहे.भीमकुमार शिवकुमार मंडल वय २६ वर्ष मूळ रा.मधुबनी बिहार असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.दरम्यान २४ जानेवारी रोजी देशभर राष्ट्रीय बालिका दिवस साजरा होत असतांनाच मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यात चिमुरडीवर अशा प्रकारे अत्याचार होत असल्याने जिल्ह्यातील मुलींच्या सुरक्षेचाप्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काटई गावातील एका चाळीत पीडित चिमुरडी आपल्या आई वडिलांसह राहत असताना रविवारी सायंकाळी चिमुरडी चाळी बाहेर खेळत होती.सायंकाळी सहा नंतर ती परिसरात आढळून न आल्याने आईने सर्वत्र शोधाशोध सुरु केली मात्र ती न सापडल्याने अखेर निजामपुरा पोलीस ठाण्यात आईने तक्रार दिली.याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला .घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे ,सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीप बने व पो उपनिरी सचिन कुंभार,आशिष पवार,धोंगडा व पोलीस कर्मचार शिरसाठ,सोनवणे,कोळी,सांबरे,शिंदे, बनसोडे या पथकाचे सहा पथक बनवून घटनास्थळापासून सुमारे पाच किलोमीटरचा परिसर पिंजून काढत रात्री उशिरा पीडितेच्या खोली पासून चार खोल्या सोडून असलेल्या एका बंद खोली पोलिसांनी छतावरून जात खोली उघडली असता दरवाजाच्या पाठीमागे चिमुरडी निपचित पडली होती.तर नराधम देखील याच ठिकाणी विवस्त्र अवस्थेत आढळून आला.पोलीस पथकाने तातडीने चिमुरडीस आयजीएम रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.

या प्रकरणी नराधम भीमकुमार शिवकुमार मंडल यास ताब्यात घेत त्याविरोधात अपहरण,बलात्कार पोस्को सह हत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जर आरोपीस अजून काही तासांचा अवधी मिळाला असता तर त्याने या शहरातून पलायन केले असते व त्यांनतर त्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आले असते,या नराधमाविरोधात अधिकाधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती निजामपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी दिली आहे.

नराधम हा काही दिवसांपूर्वीच या चाळीत रहायला आला असल्याने त्याची कोणाशी ओळख नव्हती,मुलीला त्याने खाऊचे अमिष दाखविले असावे व त्याचाच फायदा घेत त्याने हे अत्याचारी कृत्य केले असावे,या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तेव्हाच माझ्या चिमुरडीच्या आत्म्याला शांती मिळेल अशी संतप्त प्रतिक्रिया पिडीत चिमुरडीच्या आईने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी