ठाणे : सरत्या वर्षाला निरोप देताना ३१ डिसेंबरला रात्री आकाशात खग्रास चंद्रग्रहण दिसण्याचा योग ३१ डिसेंबर २०२८ च्या रात्री आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचागकर्ते, खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिली. ३१ डिसेंबरची रात्र सर्वांना प्रिय असते. कारण त्या रात्री १२ वाजता सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि नूतन वर्षाचे स्वागत करायचे.
अनेक लोक पर्यटनस्थळी जाऊन संपूर्ण रात्र जागून काढतात. समजा ३१ डिसेंबरला पौर्णिमा आली आणि त्या रात्री आकाशात खग्रास चंद्रग्रहण दिसले तर काय, याबाबत बोलताना सोमण म्हणाले की, पाच वर्षांनी तसा योग येणार आहे.
या वेळी दिसेल खग्रास चंद्रग्रहण
ग्रहण प्रारंभ - रात्री ८:३७
खग्रास स्थिती प्रारंभ रात्री ९:४६
खग्रास स्थिती समाप्ती रात्री १०:५८
ग्रहण समाप्ती- रात्री १२:०७
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्थानिक अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असून तारापूर येथील उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांची त्वरित बदली करण्यात यावी.
- कुंदन संखे,
जिल्हाप्रमुख, शिवसेना पालघर