शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
5
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
6
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
7
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
8
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
9
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
10
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
11
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
12
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
13
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
14
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
15
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
16
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
17
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
18
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
19
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
20
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

भिवंडीत ट्रकची दुचाकीला धडक...अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, दुसरा मित्र गंभीर, चालक फरार

By नितीन पंडित | Published: May 30, 2024 5:03 PM

यक्ष नवनाथ नाईक (१३) असे अपघातात दुर्दैवी मयत पावलेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे. तर आर्यन पाटील असे त्याच्या गंभीर जखमी साथीदार मित्राचे नाव आहे.

भिवंडी: भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली असता झालेल्या अपघातात एका १३ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा ट्रकखाली चिरडून जागीच तडफडून मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास तालुक्यातील खारबाव गावच्या हद्दीतील फिरींगपाडा येथे घडली आहे. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे. या अपघाताची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलीसांनी सीसीटिव्हीच्या आधारे फरार ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे. यक्ष नवनाथ नाईक (१३) असे अपघातात दुर्दैवी मयत पावलेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे. तर आर्यन पाटील असे त्याच्या गंभीर जखमी साथीदार मित्राचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यक्ष हा ७ वी इयत्तेत शिकत असून आर्यन हा १० वी इयत्तेत शिकत आहे. आर्यन हा फिरिंग पाडा येथे राहत असल्याने तो मित्र यक्ष सोबत आजी - आजोबासाठी काही सामान घेऊन जात असताना सदर दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मयत यक्ष आणि आर्यन हे दोघे खारबाव गावातून ॲक्टिव्हा दुचाकीवरून फिरींगपाड्याच्या दिशेने कामानिमित्त निघाले होते.त्यावेळी खारबावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकीला जोरात ठोकर दिली.या अपघातात दोघेही मित्र चिरडले गेले.त्यामध्ये यक्षचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेनाकरिता येथील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला आहे.तर आर्यनची प्रकृती गंभीर असून त्यास उपचारासाठी अंजूर फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात फरार ट्रक चालकाच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून सीसीटिव्हीच्या साहाय्याने त्याचा शोध सुरू केला आहे.पुढील तपास तालुका पोलिस करीत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडीAccidentअपघात