कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दक्षता गुणनियंत्रण विभागातील अधिकारी संजय सोमवंशी एका कंत्राटदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची पुष्टी अद्याप झालेली नाही. मात्र या प्रकरणी महापालिका आयुक्त संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात काय कारवाई करतात ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महापालिकेच्या दक्षता गुण नियंत्रण विभागात एक प्रयोगशाळा आहे. या प्रयोग शाळेतून महापालिका हद्दीत सुरु असेलेल्या विकास कामांचे गुण नियंत्रण केले जाते. त्याची दक्षता घेतली जाते. एखाद्या काम निकृष्ट झाले असल्यास त्या कामात काय आणि कोणत्या प्रकारचे साहित्य वापरेल आहे. याची तपासणी या विभाागकूडन केली जाते. या विभागातील अधिकाऱ्याचा कंत्राटदाराकडून पैसे घेतल्याचा व व्हिडिओ समोर आल्याने महापालिकेच्या विकास कामांचे गुण नियंत्रण पैसे घेऊन केले जात आहे का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
आयुक्त काय म्हणाले?
या प्रकरणी केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांनी सांगितले की, या व्हीडीआेची शहानिशा केली जाईल. कायदेशीर कारवाई केली जाईल. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.