शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

जर्मन पती सोबत महिलेने दुचाकी वरून १५५ दिवसांचा प्रवास करत गाठले भाईंदर

By धीरज परब | Published: November 27, 2022 9:27 PM

विशेष म्हणजे एकूण प्रवासात पाकिस्तान मध्ये त्यांना लोकां कडून जास्त आपुलकी आणि प्रेम मिळाल्याचे तिने सांगितले . 

मीरारोड - भाईंदरच्या नवविवाहित तरुणीने जर्मन पती सोबत सासर वरून दुचाकीने १९ देश व १५५ दिवसांचा प्रवास करत भारताच्या भाईंदर मधील माहेर गाठले .  विशेष म्हणजे एकूण प्रवासात पाकिस्तान मध्ये त्यांना लोकां कडून जास्त आपुलकी आणि प्रेम मिळाल्याचे तिने सांगितले . 

भाईंदरच्या जेसलपार्क भागातील रविराज कॉम्प्लेक्स मध्ये लहानाची मोठी झालेली मेधा राय हि गेल्या ७ वर्षां पासून जर्मनी मध्ये राहते. शिक्षण पूर्ण केल्या नंतर तिकडेच ती नोकरीला आहे . मार्च मध्ये तिने तिचा मित्र हॉक याच्याशी जर्मनी मध्येच न्यायालय पद्धतीने लग्न केले .  कोविड मुळे तिचे आई - वडील आदी मुलीच्या लग्नात उपस्थित राहू शकले नाहीत . 

भारतात आपल्या घरी जाण्यासाठी मेधा व पतीने दुचाकी वरून जाण्याचा निर्णय घेतला . ती सुद्धा चांगली बायकर असल्याने दोन दुचाकी वरून दोघांनी जर्मनीच्या घरातून आपला भारत प्रवास सुरु केला .  १९ देशांचा प्रवास करत १५५ दिवसांनी म्हणजेच २६ नोव्हेम्बर रोजी दोघे भाईंदर मध्ये दाखल झाले. सुमारे २४ हजार किमी चा प्रवास दुचाकी वरून केला . जेसलपार्क येथे पोहचल्यावर तिच्या कुटुंबियांसह रहिवाश्यांनी मेधा व जर्मन जावयाचे उत्स्फूर्त स्वागत केले . 

मेधा हिने तिचा प्रवासाचा अनुभव सांगताना सर्वात जास्त प्रेमळ स्वागत पाकिस्तान मध्ये झाल्याचे ती म्हणाली . पाकिस्तान मध्ये पोहचल्यावर तेथील पोलिसांनी काही असुरक्षित भागात संरक्षण देत सुरक्षित ठिकाणी सोडले . मी भारतीय आहे कळल्यावर पाकिस्तान मध्ये तर लोकं खुश झाल्याचे दिसले . तेथील नागरिकांनी तीन वेळा आम्हाला चहा प्यायला घरी बोलावले.  नाहीतर भारतात जाऊन सांगाल कि पाकिस्तान मध्ये चहा सुद्धा पाजला नाही अशी तेथील नागरिकांची आठवण मेधाने आवर्जून सांगितली . 

वाघा बॉर्डर ओलांडून दोघे भारतात आले . १९ देशांचा दुचाकी वरून प्रवास करताना प्रत्येक ठिकाणी लोकं खूप चांगले असतात व त्यांना प्रत्येकाला मदत करायची असते असा अनुभव तिने सांगितला . काही ठिकाणी भाषेत अडचण आली . इराण मध्ये सैल कपडे घालावे व चेहरा कपड्याने झाकण्यास सांगण्यात आले . मात्र तेथील लोकं सुद्धा चांगले सहकार्य करणारे होते असे मेधा म्हणाली . 

टॅग्स :thaneठाणे