अनिकेत घमंडीडोंबिवली : कोरोनामुळे लॉकडाऊननंतर आता तीन महिन्यांनी सलून उघडण्याचा निर्णय डोंबिवली नाभिक महामंडळाने घेतला असून यापुढे केस कापायला जाताना आधारकार्ड बाळगणे गरजेचे असेल. एक ग्राहक केस कापून गेल्यानंतर साहित्य निर्जंतुक करायचे असल्याने १० मिनिटांच्या अंतराने दुसऱ्या ग्राहकाला प्रवेश दिला जाणार आहे.ग्राहक व कारागिर यांना मास्क वापरणे अनिवार्य असेल. एका वेळी केवळ दोघांना प्रवेश मिळणार आहे. येणाºया प्रत्येक ग्राहकाला स्वतंत्र टॉवेल किट (एकदा वापरून फेकण्यात येणारे) वापरण्यात येणार आहे. यामुळे केस कापण्यासाठी आता ग्राहकाला अतिरिक्त ४० रुपये मोजावे लागणार आहेत. वातानुकूलित दुकानात सुविधा हवी असल्यास यापुढे ८० रुपयांऐवजी १२० रुपये मोजावे लागणार असून साध्या दुकानात १०० रुपये आकारले जाणार आहेत. ग्राहकाला ताप नाही ना, याची तपासणी केल्यावर मग प्रवेश दिला जाईल. यासंदर्भात डोंबिवलीतील व्यावसायिकांची गुरुवारी बैठक झाली. एसीमध्ये १२० रुपये आकारत असतानाच शासन नियमानुसार एसी लावायला तूर्त बंद असल्याने एसी लावला जाणार नाही. फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळतानाच सॅनिटायझर, स्वच्छता याबाबत खबरदारी घेणार असल्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यांत नाभिक समाजाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.>फलक लावणारग्राहकांनी पाळण्याच्या नियमांबाबत एक फलक तयार करून तो दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. तसेच ज्या सुविधा मिळतील, त्याचा तपशील दर्शनी भागात लावण्यात येणार असल्याचे महामंडळाचे बाळा पवार यांनी सांगितले.
केस कापण्याकरिता आधारकार्डाची सक्ती, एका वेळी दोन जणांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 1:02 AM