कल्याण- आधारवाडी डंपिंगला काल मोठी आग लागली. कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास कचरा डंपिंगवर जाणार नाही. आग लागणारच नाही याकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष वेधले आहे.
आधारवाडीत कचऱ्याचा डोंगर हा दुर्गाडी किल्यापेक्षा मोठा झाला आहे. त्याठिकाणी कच:यात उन्हाच्या तडाख्यामुळे मिथेन वायू तयार होऊन आपोआप कच:याला आग लागते. लॉकडाऊन ही कचरा वर्गीकरणाची संधी समजून कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने सक्ती केली आहे. वेंगूर्ला नगरपरिषदेत कचरा प्रक्रियेचा पॅटर्न यशस्वी करुन डंपिंग मुक्त करणारे अधिकारी रामदास कोकरे हे महापालिकच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त आहेत.
महापालिकेने बायोगॅस प्रकल्प व प्लास्टीक पासून इंधन तयार करण्याचे प्रकल्प कार्यान्वीत केले आहे. या प्रकल्पाना पुरेसा कचरा मिळत नाही. कचरा वर्गीकर झाल्यास हे प्रकल्प योग्य प्रकारे चालतील. कचरा प्रकल्प प्रभागात नको, प्रकल्पांना विरोध केला जातो. न्यायालयाकडून प्रकल्प पूर्णत्वात येत नसल्याने ताशेरे ओढले जातात. प्रकल्प उभे न राहिल्याने आधारवाडी बंद होत नाही. कचरा वर्गीकरण करण्यास सांगितले तर लॉकडाऊनमध्ये डस्टबीन नाही.
कामगर येत नाही. वेळ नाही अशी कारणो नागरीकांकडून दिली जातात. ही कारणो देणारे लोकच कचरा उचलला गेला नाही तर प्रशासनाच्या नावाने शंख वाजवितात. कोरोनामुक्तीसाठी सगळे लोक एकवटले आहे. त्याचप्रमाणो शहर कचरा मुक्त व डंपिंगमुक्त करण्यासाठी एकत्रित यावे. महापालिकेस सहकार्य करावे. कचरा वर्गीकरण झाल्यास डंपिंगवर कचरा जाणार नाही. डंपिंगला आग लागणारच नाही, याकडे उप अभियंता मिलिंद गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे.
कचरा वर्गीकरणाच्या सक्तीची ही वेळ नाही..
महापालिका हद्दीत कचरा वर्गीकरणाची सक्ती केल्याने कचरा कुंडय़ा हटविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. कचरा वर्गीकरण करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात सक्ती करण्याची ही वेळ नाही असा याकडे शिवसेना नगरसेवक सचिन बासरे यांनी लक्ष वेधले आहे. महापालिका नागरीकांकडून 72 टक्के कर गोळा करते. नागरीकांना कचरा वर्गीकरणासाठी डस्टबीन पुरवित नाहीत. आहे त्या कुंडय़ा काढून घेते. कोरोनाच्या काळात ही सक्ती करणो योग्य नाही. तसेच वेंगूर्ला डंपिंगमुक्त झाले. त्याठिकाणची लोकसंख्या व कच:याचे प्रमाण व कल्याण डोंबिवलीतील लोकसंख्या कच:याचे प्रमाण यात फरक आहे.