ठाणे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी (आप)च्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करून आंदाेलन छेडले. यास केंद्रातील भाजपा सरहकार, आरएसएस जबाबदार असल्याचा आराेप या वेळी कार्यकर्त्यांकडून र्करण्यात आला.
येथील शासकीय विश्रामगृहाजवळ करण्यात आले. या आंदाेलनासाठी सकाळीच कार्यकत्यांनी येथे एकत्र येत आंदाेलन छेडले. यावेळी त्यांनी आम आदमी पार्टी असे लिल्या टाेप्या घालून केजरीवाल यांचे छायाचित्र असलेले फाेस्टर, केंद्र सरकार विराेधातील विविध घाेषणा असलेले बॅनर्स, पाेस्टर घेऊन कार्यकर्त्यांन र्यावेळी निदर्शने केली. दिल्लीतील जनतेला सुखसोयी देणारे केजरीवाल यांना ईडीच्या मार्फत अटक करून केंद्र सरकारने अन्याय केला असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांकडून ऐकवण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे,अमर आमटे, संकेत वाडकर,
दिनेश ठाकूर, सतीश सलुजा, संतोष केदारे, प्रीती शिंदे, करमसीह इकबाल, संतोष शिंदे, दुरिया घडीआली,आरती सोनवणे,रमेश वर्मा,नितीन देशमुख, विजय पंजवानी आदी कार्यकर्ते या आंदाेलनात सहभागी होते .