ठाणे: आईच्या कुशीत झोपी गेलेल्या पाच महिन्यांच्या 'दादा'चे अपहरण करणाऱ्या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांनी अटक करत, बाळाची सुखरूप सुटका केली, ठाणेनगर पोलिसांनी जेमतेम चार तासात गुन्हा उघडकीस आणला, अटक केलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश असून, यातील जावेद अजमत अली न्हावी याच्याविरोधात ठाणेनगर, राबोडी आणि कळवा या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली अपहृत बाळाला ताब्यात दिल्यावर मातेचे डोळे पाणावले राबोडी परिसरातील आवेद अजमत अली न्हावी (३५), सुरेखा राजेश खंडागळे (३४) आणि क्रिक नाका येथील जयश्री याकूब नाईक (४५) असे अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाने नात आहे.
ठाण्यातील जेल तलावजवळील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या वनिता पवार (३५) या शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे पाच महिन्यांच्या 'दादा'ला कुशीत घेऊन झोपी गेल्या, थोड्या वेळानंतर त्यांना आग आली तर कुशीत बाळ नसल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट ठाणेनगर पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, ठाणेनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पथक स्थापन करून त्या बाळाला शोधण्यास सुरुवात झाली.
आई गहिवरली...पोलिस तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी निद्धी हॉलच्या समोरील ब्रिजच्या खाली बाळाला घेऊन गेले व त्याची आई वनिता पवार हिच्या हातात सुखरूप सोपवले, बाळाला पाहून ती गहिवरली.
पोलिसांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळली.पोलिसांना काहीतरी बक्षीरा। द्यावं या भावनेनी तिने दमलेल्या पोलिसांसाठी कोल्डिंक्स तरी मागवा, असे पती राकेश यांना सांगितले. नौपाडा विभागाच्या सहायक आयुक्त प्रिया ढाकणे यांनी कोल्ड्रिंक्सला नम्रपणे नकार देत 'बाळाला जपा', असा सल्ला दिला.
अवघ्या चार तासांत गुन्हा उघडकीस • सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बाळाला नेणाऱ्यांची माहिती कळल्यावर पोलिसांनी त्यांना अटक करत बाळाची सुटका केली.
अवघ्या चार तासांत गुन्हा उघडकीस आणला. हे त्रिकूट बाळाचे अपहरण करून ते कोणाला विकणार होते का? यापूर्वी त्यांच्या अशाप्रकारे गुन्हे केले आहेत का? यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का? त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले, ठाणेनगर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक खेडकर, हेडकॉन्स्टेबल विक्रम शिंदे, गांगुर्डे, पो. हवालदार तानाजी अंबुरे, सागर पाटील, प्रकाश जाधव, पंकज दाभाडे, संदीप चव्हाण यांनी कामगिरी केली. पोलिस उपनिरीक्षक भारत मास्कड तपास करत आहेत.