शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पुढील दशकाची पायाभरणी, अभिजित फडणीस यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 11:51 PM

Budget 2021 : कोविडमुळे आलेली मरगळ दूर करणे एवढेच नाही तर पुढील दशकाची पायाभरणी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. सर्वात लक्षवेधी म्हणजे स्वास्थ्य हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि त्यासाठी सर्वंकष विचार या अर्थसंकल्पात झालेला दिसतो

ठाणे : कोविडमुळे आलेली मरगळ दूर करणे एवढेच नाही तर पुढील दशकाची पायाभरणी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. सर्वात लक्षवेधी म्हणजे स्वास्थ्य हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि त्यासाठी सर्वंकष विचार या अर्थसंकल्पात झालेला दिसतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांनी केले.स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठानतर्फे मराठी ग्रंथ संग्रहालय येथे केंद्रीय अर्थसंकल्प २०२१- २२ या विषयावर फडणीस यांचे नुकतेच व्याख्यान झाले. यावेळी समाजसेवक डॉ. राजेश मढवी, उद्योजक अशोक जोशी, संस्थेचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर आदी उपस्थित होते.फडणीस म्हणाले की, ‘भारताने कोविडबद्दल अतिशय सावध पवित्रा घेतला आणि त्या संकटाचे निवारण शिस्तबद्ध प्रकारे सरकारने केले. सुरुवातीच्या काळात खर्चावर नियंत्रण ठेवले आणि कोविड आटोक्यात आलेला दिसल्यावर सप्टेंबरनंतर अतिशय वेगाने खर्चात वाढ केली. रिझर्व्ह बँकेनेही आपली वित्तीय नीती सढळ ठेऊन बाजार अडचणीत येणार नाही, याची काळजी घेतली. परिणामी चार महिन्यांतील जीएसटीचा भरणा अर्थव्यवस्था मार्गावर आल्याचे दर्शवतो आहे. नुकत्याच घोषित झालेल्या अर्थसंकल्पात करविषयक कुठलेच महत्त्वाचे बदल न करता आपले पूर्ण लक्ष खर्चाच्या गुणवत्तेवर आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्वच पैलूंवर केंद्रित केलेले दिसते.’ ‘भांडवली खर्चावर भर देऊन शेतकी व्यवस्था, महामार्ग, रेल्वे, वीज वितरण, सार्वजनिक वाहतूक, मेट्रो अशा सर्वच पायाभूत साधनांवरील खर्चात घसघशीत वाढ अर्थमंत्र्यांनी केली आहे. रेल्वेच्या बाबतीत पुढील दशकात गुणात्मक बदल घडवण्याचा हेतू सरकारने स्पष्ट केला आहे. मेक इन इंडिया प्रत्यक्षात यावे आणि जगाच्या बाजारपेठेसाठी भारतात निर्मिती व्हावी म्हणून ‘परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेन्टिव्ह’साठी भरीव प्रावधान अर्थसंकल्पात केले आहे तसेच सात टेक्सटाईल पार्क निर्माण केले जाणार आहेत.’१५ हजार गुणवान शाळांना मॉडेल या स्वरूपात विकसित करणे, १०० सैनिक शाळांची निर्मिती, ७५० एकलव्य विद्यालये, डिजिटल पेमेंट वाढावीत म्हणून अनुदान, डिजिटल सेन्सस, वीज वितरण क्षेत्रात ग्राहकांना पर्यायी सेवा पुरवठादार असावा,  अशी रचना तसेच बंदरांसाठी खासगी व्यवस्थापन, गॅस वितरणाची व्याप्ती वाढवणे, किमान मूल्याने शेतमाल खरेदी करण्यात प्रचंड वाढ अशा काही अर्थसंकल्पातील उल्लेखनीय गोष्टी आहेत, असे ते म्हणाले. 

पैसे उभारण्यासाठी मालमत्तांची विक्रीकॉर्पोरेट कर कमी केलेले असल्याने इतर मार्गाने वेगाने पैसे उभे करण्याची जबाबदारी सरकारने पेलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी दोन बँक, एक विमा कंपनी यांचे खासगीकरण, जीवन बीमा निगमच्या शेअर्सची विक्री, गॅस पाइपलाइन, विमानतळ, गोदामे, हायवे तसेच सार्वजनिक उद्योगांची किंवा सरकारी मालकीची वापरात नसलेली मालमत्ता यांची विक्री, यातून पैसे उभारणी करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Economyअर्थव्यवस्था