डोंबिवली : अभिनव सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या ४ पदांसाठी रविवारी निवडणूक होणार आहे. एकूण १५ संचालकपदांपैकी अभिनव सहकार पॅनलचे ११ जण अगोदरच बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता २ महिला प्रतिनिधी व इतर मागासवर्ग आणि भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील उमेदवार अशा ४ जणांमध्ये निवडणूक होणार आहे. अभिनव सहकार पॅनलच्या समोर वैयक्तिकरीत्या काही उमेदवार निवडणूक लढवत आहेत. डोंबिवलीत स्थापन झालेल्या या बँकेच्या ठेवी ३८६ कोटी असून कर्जपुरवठा २३८ कोटी इतका आहे. गेल्या ५ वर्षांत बँकेच्या नफ्यात वृद्धीही झालेली आहे. मार्च २०१५ मध्ये संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात बँकेस ५.२९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. बँकेच्या मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांत एकूण १५ शाखा असून बँकेचे एकूण ३५ हजार भागधारक आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांत माजी आ. रमेश पाटील, दिगंबर नेहेते, पोपटलाल भंडारी, शंकर भोईर, रवींद्र असोदेकर, सत्यवान म्हात्रे, जितेंद्र भोईर, श्रीधर पाटील, दिलीप भोईर, दिलीप पाटील, उदयचंद्र बनसोडे यांचा समावेश आहे. उर्वरित ४ जागांसाठी ७ उमेदवार आहेत.
अभिनव बँकेसाठी ४ जागांत लढत!
By admin | Published: July 25, 2015 4:06 AM