पंकज रोडेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही सलग तिसºयांदा अनुपस्थिती दर्शवून, ठाणे मॅरेथॉनमध्ये हॅट्ट्रिक केली.ठाणेकरांनी महापालिकेवर शिवसेनेला पहिल्यांदाच एकहाती सत्ता दिल्यानंतरही ठाकरे कुटुंबीयांनी यंदाही स्पर्धेला पाठ दाखविली.मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या शहराने पहिल्यांदा शिवसेनेला सत्तेची चव चाखायला दिली. आता तर ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. येथील प्रमुख कार्यक्रमांच्या यादीत पक्षप्रमुख आणि युवासेनाप्रमुखांची नावे हटकून असतात. ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धाही राज्यस्तरीय आहे. ती २८ वर्षांपासून सातत्याने भरवली जाते. असे असूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलग तिसºयांदा अनुपस्थित राहून ‘विक्रम’ प्रस्थापित केला आहे. यंदाही ते अनुपस्थितच राहिले. त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही सलग तिसºयांदा अनुपस्थित राहून यंदा ‘विक्रम’ केला. २०१४ मध्ये या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून सत्ताधाºयांनी पक्षप्रमुखांना वितरण सोहळ्याचे निमंत्रण दिले. गळ घातली, तरीही ते आले नाहीत, पण त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठविले, पण २०१५ आणि २०१६ या दोन्ही वर्षी पक्षप्रमुख, युवासेनाप्रमुख आलेच नाहीत.
ठाकरे पिता-पुत्रांची अनुपस्थितीची हॅट्ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 2:12 AM