भिवंडी : शहरात गौरीपाडा येथील घर क्र. ५८४ या जागेवर सुरू असलेल्या अनाधिकृत इमारतीच्या बांधकामांवर शासनाच्या एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश असताना त्याचे पालन न करता अनाधिकृत बांधकामास प्रोत्साहन दिल्याचा आरोप करीत पालिकेच्या विधी विभागाने भोईवाडा पोलीस ठाण्यात प्रभाग समिती क्र.४ मधील प्रभाग अधिकाºयांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.शहरातील नागरिकांना सेवासुविधा देण्याच्या दृष्टीने सोयीचे व्हावे,तसेच प्रत्येक ठिकाणी अधिकाºयांना पोहोचता यावे या करीता पालिका प्रशासनाने शहरात पाच प्रभागात पालिकेचे कामकाज वाटून दिले आहेत.असे असताना पाचही प्रभागात सुरू असलेल्या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात प्रभाग अधिकारी व बांधकाम विभागातील अधिकारी असमर्थ ठरले आहेत. ही कारवाई न केल्याने आयुक्त डॉ.योगेश म्हसे यांनी गेल्या वर्षभरांत २२ अधिकारी व कर्मचाºयांना निलंबीत केले आहेत. त्यापैकी १२ जणांना कामावर हजर करीत त्यांची चौकशी सुरू आहे.तर १० जणांना निलंबीत केले आहेत. सध्या शहरातील अनाधिकृत इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयांत २७० प्रकरणे सुरू आहेत. त्यापैकी उच्च न्यायालयाने ७२ इमारती तोडून त्यांचा अहवाल मागीतला आहे. मात्र संबधित अधिकारी वर्गाने २२ अनाधिकृत बांधकामे तोडल्याचे कागदावर दाखवून कारवाई पुर्ण केलेली नाही,असे पालिका सुत्रांनी सांगीतले. त्यापैकी शहरातील गौरीपाडा येथील घर क्र.५८४,प्लाट क्र.१७, हिस्सा क्र.१९२ या जागेवर झालेले अनाधिकृत बांधकाम निष्कासीत करण्याचे आदेश झाले होते.परंतू ते अनाधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यासाठी प्रभाग अधिकारीसह प्रभागातील संबधितांनी अधिकाराचा वापर न करता पालिका नियमांचे उल्लंघन केले.त्यामुळे पालिकेच्या विधी विभागातील विधी अधिकारी अनिल प्रधान यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात प्रभाग अधिकारी श्रीकांत औसरकर,बीट निरिक्षक मकसुद शेख,सर्वेअर ए.ए.घोरी व सहाय्यक सर्वेअर सरफराज अन्सारी या चौघां विरोधात एमआरटीपी महाराष्ट्र मनपा अधिनियम ३९७(क)२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने पालिका आधिकारी व कर्मचाºयांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
अनाधिकृत बांधकाम निष्कासीत न केल्याने प्रभाग अधिका-यासह चारजणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 8:44 PM
भिवंडी पालिकेच्या विधी विभागाची कारवाई
ठळक मुद्देअनाधिकृत बांधकामास प्रोत्साहन दिल्याचा आरोप करीत प्रभाग अधिका-यांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखलअनाधिकृत इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयांत २७० प्रकरणे सुरू