कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील घनकचºयाचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनला असल्याने उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी मंगळवारी हजेरी शेडचा दौरा करून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी दोन्ही सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि दोघा आरोग्य निरीक्षकांनी हजेरी शेडला दांडी मारल्याचे उपायुक्तांना आढळले. त्याची गांभीर्याने दखल घेत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांनी चौघांचे एक दिवसाचे वेतन कापले आहे. गैरहजर असलेल्या कामगारांची माहितीही उपायुक्तांनी मागवली आहे. यामुळे दांडीबहाद्दरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.सध्या घनकचºयाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकीकडे ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले जात असताना प्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई होते का, याचा आढावा महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी. वेलरासू यांच्यामार्फत वारंवार घेतला जात आहे. शहरस्वच्छता तसेच प्लास्टिकमुक्ती मोहिमेसाठी शहरस्वच्छता समिती नुकतीच स्थापन करण्यात आली आहे.केडीएमसी मुख्यालयात सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत येत्या काही दिवसांत हजेरी शेडला भेट देऊन शहरस्वच्छतेच्या कामात हयगय करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करणार असल्याची ताकीद आयुक्त वेलरासू यांनी दिली होती.त्यापार्श्वभूमीवर तोरस्कर यांनी मंगळवारी सकाळी ६.३० च्या सुमारास हजेरी शेडला भेटी दिल्या. त्यांनी कल्याणमधील ‘ब’, ‘क’, ‘जे’ आणि ‘ड’ तर डोंबिवलीतील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभागातील हजेरी शेडची तपासणी केली. या वेळी आरोग्य निरीक्षक उदय निकुंभ आणि चिंतामण मानकर हे गैरहजर असल्याचे आढळले. प्रभागांमधील कचरा उचलला जातो का, याची पाहणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते कल्याण आणि डोंबिवलीचे सार्वजनिक आरोग्य अधिकारी मधुकर शिंदे आणि विलास जोशी यांनीही हजेरी शेडला दांडी मारल्याचे तोरस्कर यांच्या निदर्शनास आले. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत दोघा आरोग्य निरीक्षकांसह दोन्ही आरोग्य अधिकाºयांचे एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई त्यांनी केली.कामगारांचीही मागवली माहितीहजेरी शेडच्या भेटीदरम्यान काही कामगार गैरहजर असल्याचेही निदर्शनास आले. त्यांचीही माहिती मागवण्यात आली असून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे तोरस्कर यांनी सांगितले.माजी आयुक्त ई. रवींद्रन यांची बदली झाल्याने त्यांच्याजागी पी. वेलरासू यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. तसेच महापालिकेतील काही पदाधिकारीही बदलले. त्याची माहिती केडीएमसीच्या संकेतस्थळावर देणे आवश्यक होते.परंतु, ही नवीन माहिती अपडेट न केल्याचा फटका संगणक विभागातील दोघांना बसला आहे. या विभागाचेही उपायुक्त असलेल्या धनाजी तोरस्कर यांनी याप्रकरणी सिस्टीम अॅनलिस्ट मीनल भदे आणि दीप्ती धुमाळ यांचे एक आठवड्याचे वेतन कापले आहे.
दांडीबहाद्दरांना उपायुक्तांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:51 PM