शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शैक्षणिक भूखंड बाजारभावानेच

By admin | Published: April 22, 2016 1:58 AM

ठाणे महापालिकेने बुधवारी झालेल्या महासभेत महापालिका हद्दीतील आरक्षित भूखंड बाजारभावाने देण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजुरीकरिता आणल्याने यापूर्वी विविध संस्थांना दिलेले

ठाणे : ठाणे महापालिकेने बुधवारी झालेल्या महासभेत महापालिका हद्दीतील आरक्षित भूखंड बाजारभावाने देण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजुरीकरिता आणल्याने यापूर्वी विविध संस्थांना दिलेले शैक्षणिक भूखंडही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतेक भूखंड हे ठाण्यातील काही बड्या राजकीय नेत्यांनीच आपल्या संस्थेसाठी घेतल्याने आता त्यांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील बैठकीत या बड्या नेत्यांचे समर्थक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.बुधवारी झालेल्या महासभेत शहरातील आरक्षित भूखंड खाजगी विकासकाला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला होता. या वेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि भाजपाचे मिलिंद पाटणकर यांनी महापालिका प्रशासनाने आणलेल्या या धोरणाचे स्वागत करून ही भाडेआकारणी विकसित केलेल्या इमारतींवर केली, तर महापालिकेस जास्त उत्पन्न मिळेल, असा मुद्दा या वेळी उपस्थित करून पालिका प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापूर्वी दिलेल्या शैक्षणिक भूखंडाचा मुद्दा उपस्थित करून हे भूखंडदेखील भाडेतत्त्वावर दिल्यास महापालिकेस दहापट जास्त नफा होईल, असा विश्वास व्यक्त केला. शैक्षणिक भूखंड ज्या संस्थांना देण्यात येणार आहेत, तसेच महापालिकेने अंतिम करार केला नाही, त्यामुळे या धोरणानुसार शैक्षणिक भूखंड त्या संस्थांना देता येतील, असा दावा केला. परंतु, आयुक्तांच्या या मताला महापौर संजय मोरे यांनी विरोध दर्शवला. महासभेने यापूर्वीच ठराव मंजूर करून या संस्थांना भूखंड विकसित करण्यास दिले आहेत. त्यामुळे हे धोरण त्यास लागू करता येणार नसल्याचे सांगितले. परंतु, शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांनी शैक्षणिक भूखंड देण्याचा ठराव तीन महिन्यांपूर्वी झाला आहे. तो ठराव आता बदलता येऊ शकतो. महापालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव सादर केल्यास भाडेतत्त्वावर शैक्षणिक संस्थांना भूखंड देण्यास हरकत नाही, असे सांगितले. या नव्या धोरणाचा सविस्तर अभ्यास करण्याचे सांगून हा प्रस्ताव पुढच्या बैठकीत चर्चा करण्याचे कारण सांगत तो तहकूब करण्यात आला. पालिकेचे सहा शैक्षणिक भूखंड ठाण्यातील विविध राजकीय पक्षांच्या संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे या भूखंडांवरून ठामपातील राजकीय मंडळी पुढच्या बैठकीत कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)