डोंबिवली : शहरातील काही खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. मात्र, दररोज मर्यादित संख्येनेच लसीकरण केले जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसीतील एका रुग्णालयात रोज फक्त १०० जणांना लस दिली जात आहे. परंतु, तेथे रोज लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना परत जावे लागत आहे.
कोरोनाच्या लसीकरणासाठी दररोज सकाळी लवकर येणाऱ्यांचा क्रमांक १०० जणांमध्ये येत आहे. त्यामुळे नियोजित वेळेवर येणारे ज्येष्ठ नागरिक नाराज होऊन परत जात आहेत शिवाय उन्हाळा सुरू झाल्याने उष्णतेचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे लसीकरणाचे काैंटर वाढवून लसीकरणाचा वेग वाढवावा, अशी मागणी परिसरातील रहिवासी राजू नलावडे यांनी नागरिकांच्या वतीने केली. त्यावर हॉस्पिटल प्रशासनाने मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लसीकरण सुरू आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना प्राधान्य देण्यात येते आहे. जे ज्येष्ठ नागरिक थेट येतात त्यांना टोकन पद्धतीने नंबर देऊन कधी यावे, याबाबत मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगण्यात आले.
------------