शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

स्थानिकांना विश्वासात घेऊन सूर्या पाणी योजनेला गती द्या, मुख्यमंत्र्यांची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 12:25 PM

शहरासाठी 'एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरू असलेल्या २१८ दशलक्ष लिटर सूर्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आमदारांच्या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना केली होती.  

मीरारोड - मीरा भाईंदर सह वसई विरार व परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा सूर्या धरण पाणी पुरवठा योजनेचे काम एमआरडीएच्या माध्यमातून सुरू असून सदर काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन कामातील अडथळे दूर करून, आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात व येत्या एक - दिड वर्षांत योजनेचे काम पूर्ण करावे, असे निर्देश प्रशासनास दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढत आहे. अपुरे पाणी आणि सततच्या तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे शहरासाठी 'एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरू असलेल्या २१८ दशलक्ष लिटर सूर्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आमदारांच्या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना केली होती.  

२०१७ च्या महापालिका निवडणुकीआधी तीन वर्षांपूर्वी सूर्या पाणी पुरवठा योजनेचे मीरारोड येथे भूमिपूजन केले गेले . परंतु योजना मात्र आजही बारगळलेली आहे. शिवाय  पालघरमधील स्थानिकांचासुद्धा वसई - विरार व मीरा भाईंदरला पाणी देण्यास विरोध आहे. 

मेट्रो ४ व मेट्रो १० जोडणाऱ्या मेट्रो कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करा -मुंबई मेट्रो मार्ग-४ हा वडाळा - कासारवडवली - गायमुखपर्यंत तर मेट्रो मार्ग क्रमांक १० हा दहिसर - काशिमीरा ते भाईंदर, असा असून या दोन्ही मेट्रोचे काम सुरू आहे. या दोन्ही मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी गायमुख ते काशीमीरा या अंदाजे ५ किमी मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया व्हावी अशी सरनाईक यांची मागणी होती. ठाणे - मीरा भाईंदर - मुंबई, असे हे सर्व मेट्रो मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास लाखो लोकांना त्याचा फायदा होईल यामुळे ही मेट्रो एकमेकांना जोडण्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे ते म्हणाले . त्यावर या मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केल्या.

मीरा भाईंदर महापालिकेत फोफावलेला भ्रष्टाचार व शहरातील कायदा सुव्यवस्था यावरही चर्चा झाली.  शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न , झोपडपट्टी पुनर्वसन योजना , मीरा भाईंदरमधील न्यायालय इमारतीचे काम , डीम्ड कन्व्हेन्स, बीएसयुपी योजनेला गती देणे, भाईंदर पूर्व - पश्चिम जोडणारा आणखी एक उड्डाणपूल मंजूर करणे , भाईंदरमध्ये जैव विविधता उद्यान विकसित करण्यास निधी उपलब्ध करून देणे आदी मुद्यांकडेही मुख्यमंत्र्यांना आमदार गीता जैन व आपण निवेदन दिल्याचे आमदार सरनाईक म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणेWaterपाणी