शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

दुसऱ्या फेरीचे प्रवेश खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 4:17 AM

शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टककयांमधील दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी सोडत काढणे अपेक्षित आहे.

सुरेश लोखंडेठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खाजगी शाळांमधील २५ टककयांमधील दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी सोडत काढणे अपेक्षित आहे. मात्र, ठाणे येथील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश दिला नाही. यावर योग्य तो तोडगा निघेपर्यंत दुसºया फेरीचे आरटीई प्रवेश खोळंबले आहेत. वेळेत आॅनलाइन अर्ज करूनही प्रवेशासाठी वेठीस धरले जात असल्यामुळे जिल्ह्यातील पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये २५ टककयांमधील १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. यातील पाच हजार ७०२ विद्यार्थी पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी निवडले. मात्र, त्यातील तीन हजार ८७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. १५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश रिजेक्ट करण्यात आले, तर उर्वरित एक हजार ६४६ विद्यार्थ्यांनी दिलेल्या शाळांमध्ये जाऊन प्रवेश घेतलेला नसल्याचे आढळून आले. यातील येथील पाचपाखाडी परिसरातील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने सुमारे २६ विद्यार्थ्यांना आजपर्यंतही प्रवेश दिले नाही. या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय दिल्याशिवाय दुसºया फेरीच्या प्रवेशासाठी लॉटरी काढली जाणार नसल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.आरटीई या कायद्याखाली देण्यात येत असलेल्या २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी या सरस्वती शाळेत केवळ पाच जागा राखीव असल्याचे शाळेचे म्हणणे आहे. परंतु, २८ जागा आरक्षित असल्याची नोंद शाळा प्रशासनाने आधीच केली, त्यानुसार लॉटरी सोडतद्वारे या शाळेसाठी सुमारे २६ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यांना शाळेने अद्यापही प्रवेश दिला नाही. शुक्रवारी उपशिक्षणाधिकाºयांकडे सुनावणी झाली. त्यावर शाळा व्यवस्थापन आता काय निर्णय घेणार, त्यानंतर दुसºया फेरीच्या प्रवेशाची तयारी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाºया खाजगी शाळांमधील केजी ते पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी आरटीईच्या १६ हजार ५४६ जागा आरक्षित आहेत. यासाठी पालकांनी १० हजार ८३९ अर्ज आॅनलाइन दाखल केले. प्रवेश क्षमतेपेक्षा प्राप्त अर्ज कमी आहेत. तरीदेखील दुसºया फेरीस विलंब होत असल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.>१६ हजारपैकी ५,७०२ प्रवेशजिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये १६, ५४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरक्षित आहेत. यापैकी केजीच्या तीन हजार ४८० विद्यार्थ्यांना, तर पहिलीसाठी १३ हजार ६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटीईअंतर्गत आरक्षित ठेवले.सरस्वती शाळेमुळे फटका : ठाणे येथील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश दिला नाही. यावर योग्य तो तोडगा निघेपर्यंत दुसºया फेरीचे आरटीई प्रवेश खोळंबले आहेत.आजपर्यंत शाळांमध्ये झालेले प्रवेशशहर शाळा निवड प्रवेश रिजेक्टठाणे मनपा-१ ८० ३८६ २६८ १३ठाणे मनपा-२ ६३ ७५० ५१२ १३अंबरनाथ ५० ३७८ २०१ ०१केडीएमसी ७७ ६७७ ४७३ १६कल्याण ग्रामीण ४६ १७० १२७ ०९भिवंडी मनपा ३२ ८९१ ६२० ३७भिवंडी ग्रामीण २९ ३१ २२ ०९मीरा-भार्इंदर ९४ २८ ०८ ०३नवी मुंबई १०४ १८६० १२७७ ५४०उल्हासनगर १९ ३१३ २१३ ०४मुरबाड १५ ०७ ०७ ००शहापूर ३१ २११ १४७ ०७