मुंब्रा - येथील बाह्यवळण रस्त्यावरून जाणारा १५ टन वजनाचा कंटेनर शनिवारी दुपारी या रस्त्या जवळील वसाहती जवळ कोसळला.सुदैवाने तो घरांपासून पाच ते दहा फूट अंतरावर कोसळला नाही.यामुळे मोठी दुरर्घटना टळली.तो जर घरांवर कोसळला असता तर मोठा हाहाकार माजला असता.या रस्त्यावरून तूप वाहून नेणा-या वाहनामधील काही तुपाच्या पिशव्या रस्त्यावर पडल्या होत्या. त्यामुळे तेलकट झालेल्या रस्त्यावरून न्हावाशेवाच्या दिशेने टायर घेऊन चाललेल्या कंटेनरचे टायर स्लिप झाल्यामुळे चालक ब्रिजलाल जैस्वाल याचा वाहनावरील ताबा सुटला.
यामुळे कंटेनर रस्त्याच्या बाजुला असलेल्या हानुमान नगर १ मधील वसाहती जवळ कोसळला.या घटनेत कुठलीही जिवित किंवा वितहानी झाली नाही.चालक जैस्वाल हा किरकोळ जखमी झाला असून त्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप केबिन मधून बाहेर काढल्याची माहिती मुंब्राअग्निशमन दलाचे स्थानक प्रमुख तांबेश्र्वर मिश्रा यांनी दिली.दरम्यान तेलकट झालेला रस्त्यावर माती टाकून तो पूर्ववत करण्यात येऊन त्यावरुन वाहतूक सुरु करण्यात आली. दरम्यानच्या काळात या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडी झाली होती.अशी माहिती स्थानिक वाहतूक(उपशाखा) शाखेचे वरीष्ठ निरीक्षक दिलिप पाटील यांनी लोकमतला दिली.